For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेडकाद्वारे होणार कॅन्सरवर उपचार

06:34 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेडकाद्वारे होणार  कॅन्सरवर उपचार
Advertisement

अलिकडेच एका संशोधनाने लोकांच्या कॅन्सरवरील उपचारासंबंधी आशा वाढविल्या आहेत. वैज्ञानिकांनी सरडा अन् बेडकात मिळालेल्या बॅक्टेरियावर संशोधन करत त्याच्या माध्यमातून आतड्याच्या कॅन्सरवर उपचार केला जाऊ शकतो असे शोधून काढले आहे. हा शोध आगामी काळात वैद्यकीय जगतात मोठा बदल घडवून आणू शकतो. जपानच्या संशोधकांनी बेडकाच्या आतड्यांमध्ये आढळून येणाऱ्या एका खास बॅक्टेरियाची ओळख पटविली असून तो कोलोरॅक्टल पॅन्सरच्या उपचारात अत्यंत प्रभावी ठरू शकतो. या संशोधनामुळे भविष्यात पॅन्सरच्या उपचारासाठी पारंपरिक केमोथेरपी आणि इम्यूनोथेरपीसोबत नवा, अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

Advertisement

जपानच्या अॅडव्हान्स्ड इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या एका संशोधन पथकाने हे अध्ययन केले असून ते आंतरराष्ट्रीय नियतकालिक गट मायाक्रोब्समध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी जपानी ट्री फॉग, जपानी फायर-बेली न्यू आणि जपानी सरड्यांच्या आतड्यांमधील बॅक्टेरियाचे अध्ययन केले. यादरम्यान त्यांना एकूण 9 बॅक्टेरियल स्ट्रेनची ओळख पटविली, ज्यात कॅन्सरविरोधी गुण आढळून आले. यातील एक बॅक्टेरिया इविंगेल्ला अमेरिकानाने असाधारण परिणाम दाखविले.

वर्तमान उपचारापेक्षा प्रभावी

Advertisement

उंदरांवर करण्यात आलेल्या कोलोरेक्टल कॅरल मॉडेलच्या परीक्षणांमध्ये इविंगेल्ला अमेरिकानाने चकित करणारे निष्कर्ष दिले. संशोधनानुसार या बॅक्टेरियाचा केवळ एमकदा नसाद्वारे देण्यात आलेले इंजेक्शनच ट्यूमरला पूर्णपणे नष्ट करण्यास यशस्वी ठरले. अध्ययनात 100 टक्के ‘कम्प्लीट रिस्पॉन्स’ रेट नोंद झाला, जो वर्तमान कॅन्सर उपचार पद्धती म्हणजेच किमोथेरेपी आणि इम्यूनोथेरेपीपेक्षा अधिक प्रभावी मानला जातोय. इविंगेल्ला अमेरिकानाची शक्ती दोन स्तरांवर काम करते. पहिला हा बॅक्टेरिया थेट कॅन्सर पेशींना नष्ट करतो, तर दुसरे म्हणजे हे शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीला सक्रीय करते, ज्यामुळे एपोप्टोसिस ची प्रक्रिय सुरू होते. एपोप्टोसिस एक नैसर्गिक प्रक्रिया असून याद्वारे शरीर स्वत:च खराब आणि पॅन्सरग्रस्त पेशींना नष्ट करते.

उपचारावरून संशोधन

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे हा बॅक्टेरिया केवळ ट्युमर असलेल्या हिस्स्यात जमा होतो आणि शरीराच्या अन्य अवयवांमध्ये फैलावत नाही. यामुळे उपचार अधिक टार्गेटेड होतो आणि दुष्परिणामांचा धोका कमी होतो. संशोधकांनुसार इविंगेल्ला अमेरिकानाची सेफ्टी प्रोफाइलही अत्यंत चांगली आहे. उपचाराच्या 24 तासांनंतरही हा बॅक्टेरिया रक्तात आढळून आलेला नाही आणि 72 तासांच्या आत शरीराच्या सूजसंबंधी प्रतिक्रिया सामान्य झाल्या. पुढील संशोधनात या बॅक्टेरियाला ब्रेस्ट पॅन्सर अणि पँक्रियाटिक कॅन्सर यासारख्या अन्य पॅन्सर वरही आजमाविले जाईल. याचबरोबर बॅक्टेरियाला शरीरात देण्याच्या अधिक सुरक्षित आणि प्रभावी पद्धतींवरही काम केले जाईल. उदाहरणार्थ डोसला छोट्या हिस्स्यांमध्ये देणे किंवा थेट ट्युमरमध्ये इंजेक्शन लावण्यावर संशोधन होईल, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.