For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एआयद्वारे होणार कॅन्सरची चाचणी

07:00 AM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
एआयद्वारे होणार कॅन्सरची चाचणी
Advertisement

रक्ताच्या एका थेंबाद्वारे होणार जीवघेण्या आजाराचे निदान

Advertisement

कॅन्सर एक जीवघेणा आजार असून याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॅन्सर या घातक आजारावर उपचार करविणेच नव्हे तर त्याची चाचणी देखील तितकीच महाग असते. परंतु आता पॅन्सरची चाचणी सोपी ठरणार आहे. रक्ताच्या एका थेंबाद्वारे कॅन्सरबद्दल कळणार आहे. फ्रॅगल नावाच्या नव्या आणि स्मार्ट एआय टूलच्या मदतीने हे शक्य आहे. सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी याची निर्मिती केली आहे. हे टूल रक्तात लपलेल्या पॅन्सरच्या संकेतांना शोधण्यास मदत करते. खास बाब म्हणजे फ्रॅगल काम अत्यंत जलद आणि स्वस्तात करते.

कसे काम करते फ्रॅगल?

Advertisement

रक्तात डीएनएचे छोटे तुकडे असतात, जर कॅन्सर असेल तर ट्यूमरमुळे डीएनएच्या सीटीडीएनए नावाचे काही तुकडे रक्तात मिसळतात. फ्रॅगल याची लांबी पाहतो आणि यात पॅन्सरयुक्त डीएनए आहे की नाही हे ओळखते. फ्रॅगल रक्तात पॅन्सरच्या अस्तित्वाची तपासणी करते.

का खास आहे ही चाचणी?

कॅन्सरच्या सर्व चाचणींच्या तुलनेत ही चाचणी अत्यंत स्वस्त आहे. या चाचणीला करविण्यासाठी जवळपास 3 हजार रुपये खर्च करावे लागतात. तर अन्य चाचण्यांसाठी 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. प्रॅगलच्या चाचणीसाठी केवळ काहीसे रक्तच पुरेसे आहे. याचा वारंवार वापर केला जाऊ शकतो. यामुळे रुग्णाला उपचार उपयुक्त ठरतोय की नाही, देखील डॉक्टरांना लवकर समजू शकते.

रुग्णांना होते मदत

फ्रॅगल रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते, कारण यामुळे उपचार प्रभावी आहे की नाही हे कळते. तसेच कॅन्सर परतला आहे की नाही, अत्यंत सोप्यामार्गाने समजू शकते. अधिक खर्च न करता रुग्णाची नियमित तपासणी केली जाऊ शकते.

सिंगापूरमध्ये वापर सुरू

सिंगापूरमध्ये या टूलचा वापर सुरू आहे. सिंगापूरमध्ये 100 हून अधिन रुग्णांवर दर दोन महिन्यांमध्ये याचा वापर केला जातोय. सीटीडीएनएमध्ये कशाप्रकारे बदल होत आहेत आणि उपचाराला रुग्णाचे शरीर कशाप्रकारे प्रतिसाद देतेय हे डॉक्टर या चाचणीद्वारे पडताळू पाहत आहेत.

भविष्यातील योजना

आगामी काळात सर्व रुग्णालयांमध्ये या एआय टूलचा वापर व्हावा अशी संशोधकांची इच्छा आहे. आम्ही प्रॅगलवरुन अत्यंत उत्साही आहोत. यामुळे उपचार स्वस्त अणि सोपा ठरणार आहे, तसेच पूर्ण जगातील कॅन्सर रुग्णांना यामुळे मदत होणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. वान यू यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.