महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन्ही खासगी भाजी मार्केटचे परवाने रद्द करा

11:38 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य रयत संघ हसिऊ सेना, बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांचे तब्बल पाच तास आंदोलन : आश्वासनानंतर आंदोलन मागे 

Advertisement

वार्ताहर/अगसगे

Advertisement

बेळगाव व संकेश्वर येथील खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यांच्यावर शासनाच्या कोणत्याच नियम-अटी लागू होत नाहीत. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. दोन्ही खासगी भाजी मार्केटचे परवाने त्वरित रद्द करा व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघ हसिऊ सेना आणि बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी सोमवारी तब्बल पाच तास आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राज्यामध्ये सरकारी भाजी मार्केट गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. या ठिकाणी व्यवहार पारदर्शक असतो आणि त्या भाजी मार्केटवर एपीएमसीचे नियंत्रण असते. त्यामुळे त्याठिकाणी सुरळीतपणे व्यवहार असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने खासगी भाजी मार्केटला परवानगी दिली होती. त्यानंतर देशामध्ये विविध ठिकाणी तीव्र आंदोलन छेडल्याने अखेर केंद्र सरकारने नियम मागे घेतला. आणि त्या-त्या राज्यातील सरकारवर ती जबाबदारी सोपवली. काही राज्यातील सरकारने खासगी भाजी मार्केटचे परवाने रद्द केले आहेत तर काही ठिकाणी तसेच आहेत, तर काही ठिकाणची प्रकरणे न्यायालयात आहेत.

त्यामुळे सरकारलाही खासगी भाजी मार्केटचा प्रश्न डोकेदुखी झाला आहे. प्रकरण न्यायालयात असताना सरकारलाही कोणतीच कार्यवाही करता येत नाही. संकेश्वर येथे सरकारी एपीएमसी भाजी मार्केट असूनही खासगी भाजी मार्केटला परवाना दिला आहे. त्यामुळे भाजी मार्केट समोरील एका मठाच्या जागेत खासगी भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. यामुळे सरकारी भाजी मार्केटवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. खासगी भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अक्षरश: आर्थिक पिळवणूक केली जात आहे. सदर भाजी मार्केट बंद करावे म्हणून शेतकरी न्यायालयात गेले होते.

मात्र एका खासगी व्यापाऱ्याने न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने वकालत करणाऱ्या वकिलांकडे सबळ पुरावे दिले नाहीत, या कारणामुळेच खासगी व्यापाऱ्याला न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे, असा आरोप यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ हसिरु सेनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी केला आहे. तहसीलदारांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच बेळगाव येथील जय किसान भाजी मार्केटमध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. बेळगाव एपीएमसीमध्ये कोट्यावधी ऊपये खर्च करून सुसज्ज असे भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. खासगी भाजी मार्केटचा परवाना रद्द करून एपीएमसीमध्येच भाजी मार्केट सुरू करावे, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे

न्यायालयामार्फतच न्याय मिळवून घ्या

घटनास्थळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर हे प्रकरण सध्या न्यायालयात असून तुम्ही न्यायालयामार्फतच न्याय मिळवून घ्यावा, तुम्हाला काही अडीअडचणी आल्यास आपण बैठक घेऊन कशा पद्धतीने न्यायालयामार्फत न्याय मिळवता येईल, याबद्दल चर्चा करूया, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी राज्य नेते प्रकाश नाईक, राज्य प्रमुख कार्यकर्ते राजू पवार, हुक्केरी तालुका अध्यक्ष शिवलिंग पाटील व इतर शेतकरी नेते, एपीएमसी भाजी मार्केटचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा...

एपीएमसी मार्केट यार्डची दोन्ही प्रवेशद्वारे दुपारी दीड वाजता बंद केली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली व वाहने दोन-तीन तास रस्त्यावरच अडकून राहिली. वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गेट बंद झाल्याने मार्केट यार्डमधील इतर व्यापारी, अधिकारी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

डीडी ऑफिसला ठोकले टाळे 

बेळगाव जिल्हा डेप्युटी डायरेक्टर यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयाला सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेने घेराव घालून अधिकाऱ्याला धारेवर धरले. कार्यालयाला टाळे ठोकून तेथून मोर्चाद्वारेच डेप्युटी डायरेक्टर चमनूर यांना पायी चालवतच कोल्हापूर सर्कल येथे 12 वाजता मानवी साखळी करून खासगी भाजी मार्केटबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर दुपारी दीड वाजता एपीएमसी मार्केट यार्डची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करून एपीएमसी कार्यालयालाही टाळे ठोकले. सरकार व अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख घटनास्थळी दाखल झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला बाजूला सरकले

आंदोलनस्थळी पोलीस खाते, एपीएमसी अधिकारी, जिल्हा एपीएमसी कायद्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत होते. त्यानंतर भाजी मार्केटमधील एक व्यापारी बेळगाव सरकारी एपीएमसी भाजी मार्केटबद्दल सांगण्यास गेले असता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या व्यापाऱ्याला बाजूला सरकले. यामुळे उपस्थित शेतकरी व व्यापाऱ्यांतून अधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article