कॅनडा पंतप्रधानांकडून ट्रम्प यांची क्षमायाचना
वृत्तसंस्था/ सोल
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्यापार शुल्काविरुद्ध संदेश देणाऱ्या जाहिरातीबद्दल क्षमायाचना व्यक्त केली. दक्षिण कोरियातील ग्योंगजू येथे पत्रकारांशी बोलताना कार्नी यांनी ‘मी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प माफी मागितली. ते व्यापार शुल्कासंबंधीच्या जाहिरातीवरून नाराज होते’, असे स्पष्ट केले. आता अमेरिका राजी झाल्यावर व्यापार चर्चा पुन्हा सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. तसेच सदर जाहिरात कॅनेडियन प्रांतातील ओंटारियोच्या सरकारने चालवली होती. ती पाहिल्यानंतर ट्रम्प संतापले. त्यांनी कॅनेडियन वस्तूंवर अतिरिक्त 10 टक्के कर लावण्याची घोषणा करतानाच अमेरिका-कॅनडा व्यापार चर्चा स्थगित केली होती. जाहिरातीत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांचे वक्तव्य वापरले होते. त्यामध्ये त्यांनी टॅरिफ हे प्रत्येक अमेरिकनसाठी हानिकारक असल्याचे वर्णन केले होते. अमेरिकेने आधीच कॅनडावर 35 टक्के कर लादला आहे. नवीन घोषणेसह ते 45 टक्क्यांपर्यंत वाढले आहे