कॅनेडियन छायाचित्रकाराचा विश्वविक्रम
सर्वात खोल पाण्यात मॉडेलचे फोटोशूट
कॅनेडियन छायाचित्रकार स्टीव हेनिंग यांनी समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 50 मीटर म्हणजेच जवळपास 164 फूट खोल पाण्यात अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. ही कामगिरी करत त्यांनी स्वत:चे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविले आहे. हे फोटोशूट आता व्हायरल होत असून युजर्सना अत्यंत पसंत पडत आहे.
स्टीव हेनिंग मॉडेल सियारा एंटोव्स्की आणि डायव्हिंग इन्स्ट्रक्टर वयाने फ्रायमॅन यांनी या विक्रमी शूटला यशस्वीपणे पूर्ण पेले आहे. स्टीव यांनी यापूर्वी 2021 मध्ये 21 फूट तर 2023 मध्ये 94 मीटर खोल पाण्यात फोटोशूटचा विश्वविक्रम केला होता. परंतु गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार डिसेंबर 2023 मध्ये बहामास येथे कॅनेडियन किम ब्रूनो आणि पिया ओयारजुन यांनी 131 फूट खोल पाण्यात शूटिंग करत विक्रम स्वत:च्या नावावर केला होता.
तर हा विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर कण्रयासाठी फोटोग्राफर स्टीव यांची टीम आणि मॉडेल सियारा यांनी रितसर प्रशिक्षण घेतले होते. सियाराने यापूर्वी देखील स्टीवसोबत काम केले होते. तर यावेळी अंडरवॉटर फोटोशूटमध्ये ती अत्यंत सुंदर दिसून येत आहे. फोटोशूटमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये असून काळ्या रंगाचे बूट तिने घातले आहेत.
164 फूट खोल पाण्यात फोटोशूट करताना ती अत्यंत सहज दिसून येत आहेत. हे शूटिंग पूर्ण करण्यास 15 मिनिटांचा कालावधी लागला आहे. कुणाच्याही आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू नये आणि ते नारकोसिसचे शिकार ठरू नयेत अशी स्टीव यांची इच्छा होती, याचमुळे त्यांनी निश्चित कालावधीपेक्षाही जलद हे फोटोशूट पूर्ण केले आहे.
शार्कची एंट्री
व्हिडिओत स्टीव आणि त्यांची टीम हे शूटिंग पूर्ण करण्यास काही अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे सांगताना दिसून येतात. फोटोशूटदरम्यान तेथे दोन शार्क मासे आले होते, त्यांना टीमने कशाप्रकारे तरी तेथून हुसकावून लावले. याचबरोबर सर्वांना सुरक्षित ठेवणे स्टीवसाठी सर्वात मोठे आव्हान होते.