For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाचा खोटेपणा पुन्हा उघड

06:15 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाचा खोटेपणा पुन्हा उघड
Advertisement

निज्जर प्रकरणात भारताविरोधात ठोस पुरावा नसल्याचा पोलीस दलाचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. भारत आपल्यावरील आरोपांचा वारंवार इन्कार करत असतानाच आता रॉयल पॅनेडियन माउंटेड पोलीस (आरसीएमपी) आयुक्त माईक ड्यूहेम यांनी कॅनडाच्या पोलीस दलाकडे भारताच्या सहभागाविषयी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे मान्य केले आहे. पॅनडाच्या सरकारी वृत्तवाहिनी सीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचीही कोंडी झाली आहे.

Advertisement

निज्जर हत्या प्रकरणात पॅनडा आणि भारतातून सातत्याने जोरदार वक्तव्ये येत असल्यामुळे दोघांमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. पॅनडाचे भारतातील माजी उच्चायुक्त पॅमेरॉन मॅके यांनी निज्जर आणि पन्नू प्रकरणात भारतावर गंभीर आरोप केले होते. भारताने हे आरोप फेटाळले असून सदर आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भारताचे म्हणणे आहे. या सगळ्या वादातच पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबतचे संबंध बिघडवण्याची कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी भारतीय मुत्सद्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता पॅनडाचे पोलीस आयुक्त या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगत आहेत. पोलीस आयुक्तांचे वक्तव्य आणि जस्टीन ट्रूडो यांच्या आरोपांमध्ये एकमत नसल्यामुळे या प्रकरणात कॅनडाची नाचक्की झालेली दिसत आहे. यापूर्वी पॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारत सरकारवर आरोप केले होते.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची गेल्या वषी जूनमध्ये पॅनडातील व्हँकुव्हरमध्ये हत्या करण्यात आली होती. निज्जर यांच्यावर गुऊद्वाराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणाचे परिणाम भारत आणि पॅनडा यांच्यातील उच्चस्तरीय राजनैतिक संबंधांवर झाले होते. आता रॉयल पॅनेडियन माउंटेड पोलीस (आरसीएमपी) आयुक्त माइक ड्यूहेम यांनी पॅनडाच्या सीटीव्ही न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर मोठे वक्तव्य दिले आहे. ड्यूहेम यांचे विधान ट्रूडो यांच्या आरोपांशी अजिबात जुळत नसल्यामुळे कॅनडाचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे.

अलिकडेच पॅनडाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतनिज्जरच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा संबंध असल्याचे भक्कम पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आला. तसेच पॅनडाने थेट भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केल्याने भारताचा संताप उसळला. मात्र, पॅनडा खोटे आणि निराधार आरोप करत असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी स्पष्ट केले होते. नंतर भारताने पॅनडातून उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले होते.

Advertisement
Tags :

.