For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेनेझुएलाला नमवून कॅनडा उपांत्य फेरीत

06:36 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हेनेझुएलाला नमवून कॅनडा उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ अर्लिंग्टन, टेक्सास

Advertisement

कॅनडाने पहिल्यादाच कोपा अमेरिकेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यश मिळविले असून त्यांनी व्हेनेझुएलावर विजय मिळविताना मॅक्झिम क्रेप्यूने तिसरी केक अडविली, तर शूटआउटच्या सहाव्या फेरीत इस्माएल कोनेने गोल केला. 2011 नंतर प्रथमच कोपा अमेरिकाच्या उपांत्य फेरीत जाण्यापासून व्हेनेझुएलाला  रोखताना कॅनडाने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी किकवर 4-3 असा विजय मिळवला.

गट स्तरावर फक्त एक गोल करूनही पुढे जाणारा कॅनडा फक्त चौथा संघ ठरला होता. कॅनडाने चिलीविऊद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सोडवल्याने त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळाला. कॅनडासाठी जेकब शॅफेलबर्गने 13 व्या मिनिटाला गोल केला तर व्हेनेझुएलासाठी 64 व्या मिनिटाला सॅलोमन रॉन्डनने बरोबरी साधली. शूटआऊटच्या पाच फेऱ्यांमध्ये प्रत्येक संघाने तीन वेळा गोल केले. त्यामुळे अतिरिक्त सत्र घेणे भाग पडले.

Advertisement

या विजयामुळे मंगळवारी रात्री न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर 48 व्या क्रमांकावरील कॅनडा आणि जगात पहिल्या क्रमांकावर असलेला आणि कोपा अमेरिका स्पर्धेचा गतविजेता अर्जेंटिना आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी पुन्हा गाठ पडेल. अर्जेंटिनाने गटातील पहिल्या सामन्यात कॅनडाचा 2-0 असा पराभव केला होता.

Advertisement
Tags :

.