For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्वासाशिवायही जिवंत राहू शकतो माणूस

06:16 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्वासाशिवायही जिवंत राहू शकतो माणूस
Advertisement

नव्या संशोधनामुळे चक्रावून जाल

Advertisement

श्वासाशिवाय माणूस काही काळापर्यंत जिवंत राहू शकतो का? अमेरिकेच्या बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या वैज्ञानिकांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यात इंजेक्शनद्वारे थेट रक्तात ऑक्सिजन पोहोचविले जाते. हे तंत्रज्ञान फुफ्फुसे पूर्णपणे निकामी झाल्यावर 15-20 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करू शकते.

हे एक स्पेशल लिक्विड फोम किंवा मायक्रोबबल्स असून ज्यात  लाखो छोटे-छोटे बुडबुडे असतात, हे बुडबुडे शुद्ध ऑक्सिजनाने भरलेले असतात, बाहेरून फॅट सारख्या लेयरने (लिपिड) आच्छादलेले असतात, जे शरीराच्या पेशींसारखे असतात.

Advertisement

इंजेक्शनने जेव्हा याला रक्तात सोडले जाते, तेव्हा हे मायक्रोबबल्स रक्ताच्या नसांमध्ये फिरतात, हळूहळू ऑक्सिजन सोडतात, यामुळे शरीराच्या पेशींना थेट ऑक्सिजन मिळतो. जुन्या तंत्रज्ञानात मायक्रोपार्टिकल्स होते, तर नव्यामध्ये वेगाने विरघळणारे मायक्रोबबल्स असून ते सुरक्षित आहेत.

आपत्कालीन स्थितीत उपयुक्त...

-बुडाल्यास

-अस्थमा अटॅक

-गळ्यात अडथळे

-गंभीर ईजा

-यामुळे डॉक्टरांना 15-20 मिनिटांचा वेळ मिळतो, ज्यात ते श्वसनाची समस्या दूर करू शकतात.

मुख्य संशोधन अन् अध्ययन

ही कल्पना डॉ. जॉन खेयर आणि त्यांच्या टीमने साकार केली आहे. यासंबंधीचे पहिले अध्ययन 2012 मध्ये झाले होते. ‘ऑक्सिजन गॅस-फिल्ड मायक्रोपार्टिकल्स प्रोव्हाइड इन्ट्राव्हेनस ऑक्सिजन डिलिव्हरी’ सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीन नियतकालिकात प्रकाशित झाले होते. यात लिपिडपासून निर्मित मायक्रोपार्टिकल्सचा वापर करण्यात आला. प्राण्यांवरील परीक्षणात हे 15-30 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करण्यास यशस्वी ठरले.

Patient wearing respirator in intensive care unit

अलिकडच्या अध्ययनात सुधार

2024 चे संशोधनपत्र ‘सिस्टीमकली इंजेक्टेड ऑक्सिजन विथइन रॅपिडली डिझॉल्व्हींग मायक्रोबबल्स इंम्प्रुव्हज द आउटकम्स ऑफ सिवियर हायपॉक्सिमिया इन स्वाइन’ हे नेचर बायोमेडिकल इंजिनियरिंग नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. यात नव्या वेगाने विरघळणाऱ्या मायक्रोबबल्सचा वापर करण्यात आला. डुकरांवरील परीक्षणात हे तंत्रज्ञान गंभीर ऑक्सिजनच्या कमतरतेत जीव वाचविणे आणि ब्रेन डॅमेज कमी करण्यास यशस्वी ठरले.

बोल्ट चिल्ड्रन्स हॉस्पिटलनुसार हे तंत्रज्ञान प्री-क्लीनिकल टप्प्यात असून सुरक्षित पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा करते. आतापर्यंत मानवी परीक्षणाची माहिती देण्यात आलेली नाही.

का आहे महत्त्वपूर्ण?

दरवर्षी लाखो लोक श्वसनाच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडत असतात. हे इंजेक्शन रुग्णवाहिका, रुग्णालये किंवा युद्धक्षेत्रात जीव वाचवू शकते. स्पेस मिशन्समध्ये देखील हे उपयुक्त आहे. परंतु हा स्थायी उपाय नसून केवळ काही मिनिटांचा ब्रिज आहे.

आव्हाने अन् भविष्य

या तंत्रज्ञानाचे अद्याप क्लीनिकल परीक्षण झालेले नाही, यामुळे माणसांकरता ते वापरले गेलेले नाही. दुष्परिणामांचा यात धोका असू शकतो, ज्यात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका सामील आहे. वैज्ञानिक याला आणखी सुरक्षित करू पाहत आहेत. विज्ञान कशाप्रकारे जीव वाचविण्याचे नवे मार्ग शोधत आहे हे या तंत्रज्ञानातून स्पष्ट होते.

Advertisement
Tags :

.