For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत्यूनंतर माणूस ऐकू शकतो का?

07:00 AM Apr 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
मृत्यूनंतर माणूस ऐकू शकतो का
Advertisement

एखाद्याच्या हृदयाचे ठोके थांबल्यावर डॉक्टर सीपीआर बंद करतात, तसेच संबंधिताला मृत घोषित केले जाते. परंतु त्याचा मेंदू अद्याप जिवंत आहे आणि त्याला सर्वकाही ऐकू येते.

Advertisement

डॉक्टर त्याच्या मृत्यूची वेळ सांगत असल्याचेही त्याला ऐकू येत असेल तर काय घडेल?

मृत्यू आजही जगासाठी एक रहस्य ठरलेले आहे. माणसासोबत मृत्यूनंतर काय घडते आणि अखेरच्या क्षणांमध्ये त्याचा अनुभव कसा असतो यावर खूप काही सांगण्यात आले आहे. या विषयांवर अनेक संशोधनेही झाली आहेत, परंतु अलिकडेच समोर आलेल्या एका संशोधनाने सर्वांना चकित केले आहे. यात माणसाच्या मृत्यूनंतरही त्याचा मेंदू काही काळापर्यंत सक्रीय असतो आणि तो आपल्या आसपासचे आवाज ऐकू शकतो, असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Advertisement

न्यूयॉर्कमध्ये एका डॉक्टरने केलेल्या खुलाशामुळे मृत्यूची व्याख्याच बदलणार आहे. हृदयाचे धडधडणे थांबले तरीही मानवी मेंदू सक्रीय असतो आणि अनेकदा रुग्ण डॉक्टरांकडून स्वत:च्या मृत्यूची घोषणा देखील ऐकतो, असा दावा एका महत्त्वपूर्ण अध्ययनात करण्यात आला असून ते रिसायटेशनमध्ये प्रकाशित झाले आहे.

या अध्ययनाचे नेतृत्व न्यूयॉर्कच्या एनवाययू लँगोन मेडिकल सेंटरचे डॉक्टर सॅम पारनिया यांनी पेले आहे. त्यांनी अशा रुग्णांचे अध्ययन केले, ज्यांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले होते, म्हणजेच त्यांचे हृदय धडधडणे थांबले होते, परंतु नंतर ते पुन्हा जिवंत झाले होते. चकित करणारी बाब म्हणजे अनेक रुग्णांनी संबंधित कक्षात घडलेल्या घटनांना अचूकपणे आठवले आहे.

डॉ. पारनिया यांच्यानुसार या रुग्णांची स्मरणशक्ती इतकी स्पष्ट यामुळे होती, कारण हृदय थांबल्यावरही जवळपास एक तासापर्यंत मेंदूत सामान्य आणि जवळपास सामान्य ब्रेन अॅक्टिव्हिटी आढळून आल्या. हे अनुभव स्वप्नासारखे नव्हते तसेच भ्रम किंवा मतिभ्रम नव्हता, हा अनुभव खास होता.

या संशोधनात अमेरिका आणि ब्रिटनच्या 25 रुग्णालयांमध्ये कार्डियक अरेस्टमधून वाचलेल्या 53 रुग्णांच्या मेंदूतील हालचाली आणि जागरुकतेचे अध्ययन करण्यात आले. यात 40 टक्के रुग्णांनी आठवणी अन् सचेत विचार असल्याचे सांगितले. डॉ. पारनिया यांच्यानुसार मृत्यूसदृश स्थितीदरम्यान अनेक लोकांना आपण शरीरापासून वेगळे झालो आहोत आणि खोलीत फिरून गोष्टी पाहत असल्याचे वाटत असते.

कॉम्प्युटर अचानक रिबूट होण्यासारखे

इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (ईईजी) द्वारे रुग्णांमध्ये हृदय बंद पडल्याच्या 35-60 ािमिनटांपयंत गामा, डेल्टा, थेटा, अल्फा आणि बेटासारख्या ब्रेन वेव्स अस्तित्वात होत्या, ज्या विचार करणे आणि जागरुकतेशी निगडित होत्या असे कळते. यातून हृदय थांबल्यावरही मेंदू पूर्णपणे बंद होत नाही, तर कधीकधी उच्चस्तरीय हालचाली दाखवितो, असे कळते. हा प्रकार एखादा बंद कॉम्प्युटर अचानक रिबूट होण्यासारखा असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

पूर्ण आयुष्याचा फ्लॅशबॅक एकत्र

पूर्वी हृदय बंद पडल्याच्या 10 मिनिटांनी मेंदू स्थायी स्वरुपात हानिग्रस्त होतो, असे मानले जात होते. परंतु हे संशोधन मेंदू सीपीआर जारी राहिल्यावर दीर्घकाळ सक्रीय राहू शकतो, असे दाखवते. हाच ऊर्जेचा उभार लोकांना स्वत:च्या पूर्ण आयुष्याच्या आठवणी एकत्र पाहण्यासारखा अनुभव देऊ शकतो, असे डॉ. पारनिया यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.