For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोंढा-नंदगड जि.पं.विभागात अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा

10:22 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोंढा नंदगड जि पं विभागात अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा
Advertisement

प्रचारसभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील जिल्हा पंचायत विभागात प्रचारदौरा सुरू केला असून लोंढा आणि नंदगड येथे झालेल्या प्रचारसभेत मतदारांनी अंजली निंबाळकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यावेळी हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, खानापूर, हल्याळ, कित्तूर मतदारसंघातून अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे. यावेळी अंजली निंबाळकर यांचा विजय निश्चित असून फक्त शिक्कामोर्तब होण्यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. काँग्रेसने कर्नाटकातील सामान्य जनतेला गॅरंटी योजनाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक हातभार लावले आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष असून काँग्रेस पक्षच देशाला योग्य दिशा दाखवू शकतो. यासाठी काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. अंजली निंबाळकर म्हणाल्या, तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून खासदारांनी फक्त दिल्लीत खासदारकी मिरविली. मतदारसंघासह तालुक्यातील विकासासाठी कोणतेही काम केलेले नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात विकास हेच ध्येय असून, मी निवडून आल्यास खानापूर तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच वेगळे पाऊल उचलणार आहे. माझ्या विकासाचे ध्येय हे वेगळे असून खानापूर तालुक्याचा विकास कसा साधला जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील जनतेने राजकारण बाजूला सारुन मला भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.