For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयनगर भागात काँग्रेस उमेदवार हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ फेरी

10:30 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजयनगर भागात काँग्रेस उमेदवार हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ फेरी
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

विजयनगर-हिंडलगा भागात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेबाळकर यांच्या प्रचारासाठी विजयनगर, विनायक नगर, रक्षक कॉलनी, साईनंदन रेसिडेन्सी, पाईपलाईन रोड व वॉर्ड नंबर सहा, सात, आठ, नऊ, दहा या भागातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्यासाठी विनंती करण्यात आली. या प्रचार फेरीत ग्रामपंचायत सदस्य राहुल उरणकर, विठ्ठल देसाई तसेच शिवप्रेमी युवक मंडळ आणि या भागातील महिलांचा सहभाग होता. काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करण्यासंदर्भात विनंती केली गेली. अशा पद्धतीने शुक्रवार दि. 3 रोजी हा सर्व भाग पिंजून काढण्यात आला. प्रमुख मार्गावरून घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन मतयाचना केली. समर्थ कॉलनी व लक्ष्मीनगर भागात ग्रा.पं. सदस्य अशोक कांबळे, परशराम कुडचीकर व डिफेन्स कॉलनी, लक्ष्मीनगर पूर्व भागात ग्रा.पं. सदस्य प्रविण पाटील, सदस्या रेणुका भातकांडे यांनी फिऊन लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेबाळकर यांची प्रचारफेरी काढली.

Advertisement
Advertisement
Tags :

.