महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम

12:20 PM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

126 जणांवर कारवाई : विनाकारण फिरणाऱ्यांवरही बडगा

Advertisement

बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. खास करून नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत असून गेल्या तीन दिवसांत 126 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी समाजमाध्यमावर यासंबंधीची माहिती दिली आहे. रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असून एका दिवसात 47 जणांवर कारवाई झाली आहे. विकेंडमुळे शुक्रवारी रात्रीपासूनच शहर व उपनगरात ही मोहीम राबविण्यात आली आहे. केवळ वाहतूक पोलीसच नव्हे तर नागरी पोलिसांनाही या मोहिमेसाठी जुंपण्यात आले होते. वाहतूक उत्तर व दक्षिण विभाग पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत नशेत वाहने चालविणाऱ्या 83 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे.

Advertisement

या तीन दिवसांत एकूण 126 जणांवर कारवाई झाली आहे. वाढते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्या व नशेत वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना पोलीस उपायुक्तांनी वाहतूक व नागरी पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेवरून शुक्रवारी रात्रीपासूनच मोहीम राबविण्यात आली आहे. विकेंडच्या वेळी पार्ट्या करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे पोलिसांनी कारवाईसाठी हा मुहूर्त साधला आहे. नशेत वाहने चालवताना अनेकवेळा अपघात होतात. अपघातात वाहनचालकांना काही वेळा जीव गमवावा लागतो तर काही वेळा गंभीर दुखापत होते. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ते सुरक्षितता समितीच्या बैठकीतही बेळगाव शहर व जिल्ह्यातील वाढत्या वाहन अपघातांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article