For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय पुरुष हॉकी संघासाठी शिबिर

06:22 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय पुरुष हॉकी संघासाठी शिबिर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

पुढील महिन्यात नेदरलँड्स आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला स्विसमध्ये तीन दिवसांचे सरावाचे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी भारतीय हॉकी संघाला स्विसकडे प्रयाण करावे लागणार आहे.

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पॅडी अप्टोन यांनी हे शिबिर स्विसमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हॉकीपटुंना विदेशातील वातावरणाशी जुळवून घेण्याच्या हेतूने हे शिबिर चालू महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात आले आहे. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय हॉकी संघासाठी अशाच तऱ्हेचे शिबिर आयोजित केले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक मिळविले होते. पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय हॉकी संघाला आशियाई स्पर्धेसाठी सज्ज व्हावे लागेल. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान घेतली जाणार असून सदर स्पर्धा ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टिकोनातून भारतीय संघाला महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.