कॅमेरून डियाजचे पुनरागमन
बॅक इन अॅक्शन’मध्ये मुख्य भूमिका
हॉलिवूडचा स्पाय-कॉमेडी चित्रपट ‘बॅक इन अॅक्शन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कॅमेरुन डियाज आणि जेमी फॉक्स मुख्य भूमिकेत आहेत. दोघांनीही चित्रपटात पूर्वाश्रमीच्या सीआयए एजंटची भूमिका साकारली आहे. हॉलिवूडचा हा चित्रपट अॅक्शनने नटलेला आहे.
कॅमेरुनने या चित्रपटाद्वारे 10 वर्षांच्या कालावधीनंतर अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे. ती यापूर्वी 2014 मध्ये सेठ गॉर्डनकडून दिग्दर्शित अॅक्शन चित्रपट ‘एनी’मध्ये दिसून आली होती. सीआयएच्या हेरगिरीच्या जगतातून बाहेर पडत कुटुंब सुरू केल्यावर एमिली (कॅमेरून) आणि मॅट (जेमी फॉक्स) स्वत:चे रहस्य उघड झाल्यावर हेरगिरीच्या जगतात परतत असल्याचे यात दिसून येणार आहे.
या चित्रपटात काइल चँडलर, अॅन्ड्य्रू स्कॉट आणि ग्लेन क्लोज हे कलाकारही दिसून आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेठ गॉर्डन यांनी केले आहे. तर याची कहाणी सेठ गॉर्डन आणि ब्रेंडन ओ ब्रायन यांनी मिळून लिहिली आहे. कॅमेरुनचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला असून त्यांच्यासाठी हा चित्रपट मोठी पर्वणी ठरला आहे.