सीसीटिव्हीमुळे मिळतेय अचूक पाणीपातळी! चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीच्या काठावर बसवलेत 2 कॅमेरे
नगर परिषद कार्यालयात नियंत्रण, नागरिकांना सतर्क करणे होतेय सोपे
चिपळूण प्रतिनिधी
नगर परिषदेने शहरातील वाशिष्ठी व शिवनदी काठावर दोन सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे पाण्याची अचूक पातळी समजत असून यामुळे नागरिकांना सतर्क करणे शक्य होत आहे. या कॅमेऱ्याचे नियंत्रण नगर परिषदेत असल्याने कार्यालयात बसून पाणीपातळी नोंद करता येत आहे.
शहरात पुरो पाणी कधी येईल, हे वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीवरून ठरवले जाते. येथील पाणीपातळी लक्षात घेऊन नागरिकांना भोंगे वाजवून सतर्क केले जाते. वाशिष्ठी इशारा पातळी 5 मीटर तर धोकापातळी 7 मीटर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदी पाणीपातळी अधिक मिळावी म्हणून यावर्षी बाजारपूल परिसरात योग्य पध्दतीने खोदाई करण्यात आली आहे. तसा पाणीपातळी सहज समजावी म्हणून बाजारपूल व शिवनदीच्या काठावर दोन सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या कॅमेऱ्यों नियंत्रण नगर परिषदेत असल्याने कार्यालयात बसून पाणीपातळी नोंद करणे सहज शक्य होत आहे. यापूर्वी येथे कर्मचारी पाठवून त्याच्याकडून मिळणाऱ्या आकड्यांनुसार नोंद होत होती. यावर्षी कॅमेरे बसवण्यात आल्याने 24 तास पाणीपातळी समजत आहे. ही पाणीपातळी पाहूना पूरसदृश परिस्थितीवेळी भोंगे वाजवून नागरिकांना सतर्प करण्यो काम पशासन करीत आहे. त्यामुळे हे कॅमेरे प्रशासनासह नागरिकांसाठी महत्वाचे ठरत आहेत.
अचूक आकडेवारी मिळते
वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीवर शहरात पूर येईल की नाही, या अंदाज बांधला जातो. त्यामुळे ती पाणीपातळी सहज व अचूक मिळावी म्हणून या नदीसह शिवनदीकाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्या मोठा फायदा होत आहे.
-विशाल भोसले मुख्याधिकारी, नगर परिषद, चिपळूण