For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : केंब्रिज इंटरनॅशनल स्कुल मिरजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

04:24 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   केंब्रिज इंटरनॅशनल स्कुल मिरजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
Advertisement

                                              विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्य, नाटक, मल्लखांब

Advertisement

मिरज : येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध नृत्याविष्कार व कलागुण सादर केले. प्रमुख पाहूणे म्हणून विजयकुमार नामजोशी उपस्थित होते. संस्था अध्यश्न पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील, समन्वयक डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

नामजोशी यांनी भाषणामध्ये जगाच्या स्पर्धेमध्ये आपली मुले टीकायची असतील तर संस्कार आणि व्यवहारज्ञान यांची सांगड मुलांना घालता आली पाहिजे. आणि ही शिदोरी त्यांना जपता आली पाहिजे. ही जबाबदारी त्यांनी पालक आणि शिक्षक यांच्यावर असल्याचे सांगितले. मुलांवर संस्कार आणि व्यवहारज्ञान हे शाळेतून आणि घरातून मिळते.पालकांचा सहवास मुलांना लाभला पाहिजे. पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, असे आवाहन केले.

Advertisement

यावर्षीची स्नेहसंमेलनाची मुख्य थीम ही उडान होती. पुस्तकांतून आकाश गाठत आत्मविश्वासाची साथ, केंब्रिजमधून सुरू होते उज्ज्वल भविष्याची बाट, यावर आधारित लहान गट ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्यातील कलागुण, संस्कार, सर्जनशीलता याचे सादरीकरण केले. नृत्य, नाटक, मल्लखांब, योगासने यांचे सादरीकरण केले. शेक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बिजया पाटील, मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टीन, प्रशासक रफीक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयक अश्विनी येलकर यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.