कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आज राष्ट्रीय महामार्ग ‘बंद’ची हाक

02:41 PM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नेत्यांचे आवाहन

Advertisement

संकेश्वर : यंदा उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, अशी मागणी गत 20 दिवसांपासून शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना करत आहेत. या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाकडे सरकार व कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी शुक्रवार दि. 7 रोजी हत्तरगी टोलनाक्यावरील राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करताना महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत 3500 रुपये दराची घोषणा होणार नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती अॅड. रामचंद्र जोशी यांनी दिली.

Advertisement

ते पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले, कारखानदारांनी दराची घोषणा अद्याप केलेली नाही. दराची घोषणा न करताच गाळप करताना ते जो दर देतील तो दर शेतकऱ्यांना घ्यावा लागतो. यातून शेतकऱ्यांची मोठी लूट होते. सरकार व कारखानदार याकडे दुर्लक्ष करताना ढोंग करीत आहेत. गळीत हंगामाच्या सुरुवातीस दराची घोषणा करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम कारखानदार करत आहेत.

देशाचा पोशिंदा असणारा शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून योग्य दराची मागणी करत आहे. पण आजतागायत योग्य दर देण्यात आलेला नाही. सत्तेत असणारे सरकार शेतकरीविरोधी असून फक्त मते मिळविण्यासाठी गॅरंटी योजनेवर भर दिला आहे. आंदोलन तीव्र होत असताना देखील सरकारने कोणतेच गांभीर्य घेतलेले नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मंत्री शिवानंद पाटील यांना आंदोलकांना भेटून चर्चा करण्याचा संदेश दिला होता. मात्र दोन्ही मंत्र्यांनी आंदोलकांकडे पाठ फिरविली. मंत्री एस. के. पाटील यांनी आंदोलकांना भेटून शुक्रवारी दुपारी 4 पर्यंत चर्चेसाठी डेडलाईन मागितली.

पण आम्ही निर्णय होईपर्यंत आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. अत्यावश्यक सेवा वगळता महामार्ग बंद करणार आहोत. या आंदोलनाला संकेश्वर व हुक्केरी येथील वकील संघटनेने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संकेश्वर वकील संघटनेचे अध्यक्ष पी. व्ही. घस्ती यांनी दिली. या पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे सचिव बसवप्रभु वंटमुरी, राज्य शेतकरी संघटनेचे प्रधान सचिव गोपाळ भरबसन्नावर, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष जियाउल्ला वंटमुरी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article