कळंगुटमध्ये एसीच्या शॉर्टसर्किटमुळे बंद व्हिलाला आग; 50 हजारांचे नुकसान
03:58 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कळंगुट : एसी युनिटमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे कळंगुट येथील एका बंद व्हिलामध्ये आग लागल्याची घटना घडली. व्हिला बंद असल्याने आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
Advertisement
स्थानिकांनी अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली. स्थानिकांनी वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापासून रोखण्यात आली.
या घटनेत व्हिलामधील काही साहित्याचे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. एसी युनिटमधील शॉर्टसर्किट हे आगीचे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे.
Advertisement
Advertisement