For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Warananagar News | वारणानगर परिसरात केबल चोरांचा उच्छाद! सातवे गावासह पाणीपुरवठा संस्थेवर डल्ला; २.५० लाखांचा मुद्देमाल लंपास

11:33 AM Jun 15, 2026 IST | NEETA POTDAR
warananagar news   वारणानगर परिसरात केबल चोरांचा उच्छाद  सातवे गावासह पाणीपुरवठा संस्थेवर डल्ला  २ ५० लाखांचा मुद्देमाल लंपास
Advertisement

Advertisement

वारणानगर : पन्हाळा तालुक्यातवारणा नदी काठावर केबल चोरांच्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सातवे परिसरात गुरुवारी मध्यरात्री चोऱ्यांचे मोठे सत्र घडले. चोरट्यांनी थेट सातवे गावच्या सार्वजनिक आणि सहकारी पाणीपुरवठा योजनेंतर्गत साहित्य आणि कृषी पंपांना लक्ष्य केले. विद्युत केबल्स, मोटर ऑइल, वीज मीटर आणि पत्रे असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला.खोलीचे कुलूप तोडले

गुरुवारी रात्री कर्मचाऱ्यांनी काम संपवून पाणीपुरवठा खोली बंद केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि अत्यंत शिताफीने मोटरला जोडलेली केबल, स्टार्टर, फ्युज आणि थेट वीज मीटरसह सर्व मुख्य साहित्य कापून लंपास केले.

Advertisement

या प्रकरणी सातवे ग्रामपंचायत अधिकारी तुषार गिरीगोसावी, सुदाम घाटगे, दत्तात्रय पोवार, नामदेव कांबळे यांनी कोडोली पोलिसांत चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली असून ग्रामपंचायतीचे सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.

आरळे महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेचे १. २५ लाखाचे साहित्य चोरीस

चोरीची दुसरी मोठी घटना घडली. सातवे येथील वारणा नदीकाठावर आरळे येथील महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेचे जॅकवेल आहे. येथून आरळे गावातील ३०० एकर शेतीला पाणीपुरवठा केला जातो. चोरट्यांनी या जॅकवेलच्या खोलीचे कुलूप तोडून आतील तब्बल सहा विद्युत केबल्स, मोटर ऑइल व दुरुस्तीचे पाने असा १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत संस्थेने कोडोली पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्याचे संस्थेचे संचालक सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.