For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार : डी. के. शिवकुमार

06:02 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार   डी  के  शिवकुमार
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेंगळूर :

दोन वेळा लांबणीवर पडलेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वत: या मुद्द्यावर भाष्य केले असून पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या काँग्रेस आमदारांमध्ये पुन्हा आशेचा किरण दिसून आला आहे.

Advertisement

चित्रदुर्गमधील मुरुघ मठाच्या अनुभव मंटपमध्ये शनिवारी पार पडलेल्या बेंगळूर विभाग स्तरावरील प्रगती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केली जाईल. दुष्काळी परिस्थितीबाबत मंत्र्यांना परस्परांना सहकार्य करून कामे करावी लागतील, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रयत्न सुरू आहेत. याकरिता नवीन मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी काँग्रेस हायकमांडच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशध्यक्ष बी. के. हरिप्रसाद हे तिघे मंगळवार 21 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. मात्र, दिल्लीत नीट पेपरफुटीविरोधात काँग्रेसने वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडले होते. परिणामी, मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरुप देणे शक्य झाले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेते काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा लॉबिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.