महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

06:01 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर : संतोष गंगवार यांच्याकडे झारखंडची जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मोदी 3.0 मध्ये प्रथमच 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आणि प्रशासक बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री उशिरा 6 नवीन राज्यपाल नियुक्त करतानाच तिघांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. लवकरच विधानसभा निवडणुका होणाऱ्या महाराष्ट्रात सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे विद्यमान राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे आता पंजाबच्या राज्यपालपदासोबतच चंदीगडचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कर्नाटकातील राणीबेन्नूरचे रहिवासी असलेले सी. एच. विजयशंकर यांना मेघालयचे राज्यपाल करण्यात आले आहे.

पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधाची राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती, तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ते 18 फेब्रुवारी 2023 रोजी झारखंडचे राज्यपाल बनले. त्यानंतर आता त्यांची झारखंडमधून महाराष्ट्रात बदली करण्यात आली.

कलराज मिश्रा (राजस्थान), विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), रमेश बैस (महाराष्ट्र), बनवारीलाल पुरोहित (पंजाब-चंदीगड), अनुसुईया उईके (मणिपूर) आणि फगू चौहान (मेघालय) यांना हटवण्यात आले आहे. तर, तीन राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सी. पी. राधाकृष्णन यांना झारखंडमधून महाराष्ट्रात, गुलाबचंद कटारिया यांना आसाममधून पंजाब-चंदीगडमध्ये तर लक्ष्मण आचार्य यांना सिक्कीममधून आसाम, मणिपूरमध्ये पाठवण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये हरिभाऊ बागडे

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल करण्यात आले आहे. ते औरंगाबाद जिह्यातील रहिवासी असून पॅबिनेट मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी चोखपणे कामगिरी बजावलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे 8 वेळा खासदार राहिलेले संतोष गंगवार यांच्याकडे झारखंडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आसामचे माजी खासदार रमण डेका यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

आसामचे विद्यमान राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना पंजाबचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. पंजाबसोबतच कटारिया यांना केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासकाचीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेले बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. याशिवाय लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मणिपूरची अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये यावषी विधानसभा निवडणुका होणार असल्याने तिथे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. याशिवाय हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article