For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या आयबीसीटीकडे सी डिव्हिजन चषक

10:17 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या आयबीसीटीकडे सी डिव्हिजन चषक
Advertisement

बेंगलोरच्या बलाढ्या अर्चिमाचा पराभव

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आयोजित नॉर्थ झोन सी डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आकाश देसाईच्या निर्णायक गोलच्या जोरावर बेळगावच्या आयबीसीटी संघाने बलाढ्या अर्चिमा इंटरनॅशनल एफसी संघाचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव करून सी डिव्हिजन चषक पटकाविला. बेंगळूर येथील कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगावच्या आयबीसीटी संघाने बेंगळूरच्या बेंगळूर एफसीचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात आयबीसीटीचा स्टार खेळाडू शामिलने 10, 17, 21 व 25 व्या मिनिटाला सलग 4 गोल करून आयबीसीटीला 4-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली.दुसऱ्या सत्रात आरबीसीटीचा 5 वा गोल करून 5-0 ची आघाडी या सामन्यात मिळून दिली. बेंगळूर फुटल एफसी या सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरले. शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बेंगळूरच्या अर्चिमा इंटरनॅशनल एफसीचा अटीतटीच्या लढतीत आरबीसीटी बेळगावने 3-2 अशा गोलप्रकारे पराभव करून सी डिव्हिजन चषक पटकाविला.

या सामन्यात अर्चिमा इंटरनॅशनल एफसीच्या सिद्धू राजेंद्रने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवली. 23 व्या मिनिटाला सिद्धू राजेंद्रच्या पासवर रॉबर्ट परेराने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळून दिली. पहिल्या सत्रात 44 व्या मिनिटाला आकाश देसाईच्या पासवर कर्णधार कौशिक पाटीलने गोल करून 1-2 आघाडी कमी केली. दुसऱ्या सत्रात 62 व्या मिनिटाला आयबीसीटीच्या शामिलच्या पासवर आकाश देसाईने दुसरा गोल करून 2-2 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्मान केली. 85 व्या मिनिटाला आरबीसीटीच्या ऋषीच्या पासवर आकाश देसाईने दुसरा गोल करून 3-2 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्चिमा इंटरनॅशनल एफसीने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण बेळगावच्या आयबीसीटीच्या बचावफळीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले. शेवटी हा सामना आयबीसीटी बेळगावने 3-2 गोल फरकाने पराभव करून विजेतेपद मिळविले. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष हॅरीश राव यांच्या हस्ते विजेत्या आयबीसीटी संघाला चषक, प्रमाणपत्र, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. या संघाला विजय रेडेकर, निखिल यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे. या संघात ज्येष्ठ खेळाडू किरण चव्हाण, प्रणित चिगरे, सामील, ऋषी, कौशिक पाटील, आकाश देसाई यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.