For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीवायडीची इलेक्ट्रीक कार विक्रीत आघाडी

06:34 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीवायडीची इलेक्ट्रीक कार विक्रीत आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चीनच्या बीवायडी कंपनीने बॅटरीवर आधारित इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला मागे टाकले आहे. 2025 मध्ये बीवायडी ही कार विक्रीमध्ये आघाडीवरची कंपनी राहिली आहे. चीनच्या बीवायडीने मागच्या वर्षी 22.6 लाख कार्सची विक्री केली आहे तर टेस्लाने या तुलनेत 16.3 लाख कार्सची विक्री केली होती.

2025 मध्ये इलेक्ट्रीक कारची विक्री बीवायडीने 22.6 लाख इतकी केली असल्याची माहिती आहे. या विरुद्ध पाहता एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या 16.3 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. टेस्लाची विक्री 2024 च्या तुलनेमध्ये 2025 मध्ये 9 टक्के कमी राहिली. सलगच्या दुसऱ्या वर्षामध्ये टेस्लाच्या कार विक्रीमध्ये घसरण अनुभवायला मिळाली. एलॉन मस्क हे दक्षिण पंथी राजकीय नेते असून यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरलेली दिसते. याचा परिणाम टेस्लाच्या कार विक्रीवर पहायला मिळतो आहे.

Advertisement

आकर्षक किमतीमुळे विक्री अधिक

चीनमधील कार उत्पादक कंपन्या टेस्लाच्या तुलनेमध्ये कमी किमतीमध्ये कार्स विक्रीकरिता उपलब्ध करत असून स्पर्धा वाढताना दिसते आहे. विक्रीत घसरण व इतर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचा समभाग 2025 मध्ये 18 टक्के वाढला होता. कंपनीच्या भविष्यकालीन योजनांवर गुंतवणुकदारांचा विश्वास असल्याने समभाग तेजीत आहे.

Advertisement
Tags :

.