वूमन आंथ्रप्रेन्युअर्स बिझनेस नेटवर्कतर्फे
प्रतिनिधी/ बेळगाव
वूमन आंथ्रप्रेन्युअर्स बिझनेस नेटवर्क गोवा व बेळगाव तसेच पिंक समोसा यांच्या सहकार्याने व केएलएस जीआयटीच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकता परिषद नुकतीच पार पडली. प्रमुख पाहुण्या म्हणून तरुण भारतच्या संचालक सई ठाकुर-बिजलानी, निवेदिता शिवकांत सिदनाळ व शाहीन सय्यद उपस्थित होत्या.
या परिषदेत वक्त्यांनी महिलांना उद्योजकतेची संधी, त्यासाठी आवश्यक नेतृत्व गुण याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपला उद्योजकतेचा प्रवास कथन केला. याच परिषदेमध्ये गजेंद्र त्रिपाठी व डॉ. राजश्री नागराजू-हलगेकर यांनी उद्योजकतेच्या नवीन संधी, धोरणात्मक मानसिकता याबद्दल माहिती दिली. रिना बॅरेटो-शंकर यांनी ब्रँडिंगबद्दल विशेष सत्र घेतले. या परिषदेमध्ये प्रश्नोत्तराचे सत्रही झाले. डब्ल्यूईबीएनच्या संस्थापक सिया शेख, पिंक समोसाच्या दिव्या मेहता, एमबीए विभागाच्या प्राध्यापक अंजली अगरवाल यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच त्यांच्या सहभागाबद्दल धन्यवाद दिले.