वर्षांखेरीस सेन्सेक्स 545 अंकांवर झेपावला
निफ्टीही तेजीसोबत बंद : रिलायन्स आणि बँकिंगच्या कामगिरीचा लाभ
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात आणि चालू वर्षातील (2025) अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत तेजीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये आशियातील नकारात्मक कल व अन्य घटनांच्या प्रभावातही बाजाराने चांगली मजल मारली आहे. भारतीय शेअर बाजार 2025 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात जोरदार वाढले. यासह, बाजारातील गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमधील घसरणीचा कल संपला. इंडेक्स हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे बाजारांना बळ मिळाले. तर आयटी समभागांमध्ये विक्रीचा तेजीवर नकारात्मक परिणाम झाला.
सेन्सेक्स 100 पेक्षा जास्त अंकांनी वाढून 84,793.58 वर उघडला. सुरुवातीनंतर निर्देशांकात वाढ दिसून आली. अखेर 545.52 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी वाढून 85,220.60 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) चा निफ्टी-50 25,971.05 वर उघडला अखेर 190.75 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी वाढीसह तो 26,129.60 वर बंद झाला.
सेन्सेक्सने 2025 मध्ये 9.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद केला आणि त्याची विजयी मालिका देखील 10 वर्षांपर्यंत पोहोचली. त्याच वेळी, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकाने 2025 मध्ये 5.7 टक्के वाढीसह सलग सहाव्या वर्षी वाढीचा दर राखला आहे. याउलट, निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 2025 मध्ये 5.6 टक्क्यांनी घसरला आणि त्याचा दोन वर्षांचा तेजीचा काळ खंडित झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा स्टील, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन आणि अॅक्सिस बँक हे सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये होते. दुसरीकडे, ऊण्ए, टेक महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि सन फार्मा हे सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये होते.
जागतिक बाजारपेठा
वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी आशियाई बाजारांमध्ये कमकुवतपणा दिसून आला. ऑस्ट्रेलियाचा एस अॅण्ड पी आणि एएसएक्स 200 निर्देशांक 0.17 टक्के घसरला, हाँगकाँगचा हँग सेंग 0.42 टक्के घसरला, तर चीनचा सीएसआय 300 जवळजवळ स्थिर होता. जपान आणि दक्षिण कोरियामधील बाजार बंद राहिले. आशियाई व्यापाराच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन स्टॉक फ्युचर्स सपाट होते.