For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहा पंचायतींसाठी आज पोटनिवडणूक

08:13 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहा पंचायतींसाठी आज  पोटनिवडणूक
Advertisement

बाणावलीत जिल्हा पंचायतीचीही निवडणूक, 31 उमेदवारांचे भवितव्य होणार सीलबंद

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

दक्षिण गोव्यातील आठ आणि उत्तर गोव्यातील दोन मिळून एकुण दहा ग्रामपंचायती तसेच दक्षिण गोव्यातील बाणावली जिल्हा पंचायतीसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. त्याद्वारे पंचायतीच्या 27 आणि जि. पं. च्या 4 मिळून एकूण 31 उमेदवारांचे भवितव्य  सिलबंद होणार आहे.

Advertisement

त्यानुसार दक्षिण गोव्यातील वळवई पंचायत (प्रभाग 2) मधून अंकिता नाईक आणि सर्वेश नाईक, केरी पंचायत (प्रभाग 3) मधून प्रदीप जल्मी, रामकृष्ण जल्मी आणि विशांत केरकर, कुंडई पंचायत (प्रभाग 7) मधून प्रियांका गावडे, राजश्री गावडे, राजवी गावडे आणि संजना नाईक, बोरी पंचायत (प्रभाग 11) मधून दत्तेश नाईक, नूतन नाईक आणि शिवानंद गावणेकर, राशोल पंचायत (प्रभाग 5) मधून जासिंता फर्नांडिस आणि मीफा डायस, सुरावली पंचायत (प्रभाग 2) मधून ज्युलिएटा गोम्स आणि रेश्मा डिक्रूज, असोळणे पंचायत (प्रभाग 1) मधून एल्मा डिकॉस्ता आणि वंदना बुधाळकर, शेल्डे पंचायत (प्रभाग 2) मधून प्रकाश नाईक, स्वरांजली नाईक आणि तृप्ती गावस देसाई हे उमेदवार रिंगणात आहेत.

त्याशिवाय उत्तर गोव्यातील सुकूर ग्रामपंचायत (प्रभाग 10) मधून हेरंब हळर्णकर, काजोल वाडकर, संजय रेडकर व सुभाष हळर्णकर आणि कुडणे ग्रामपंचायत (प्रभाग 2) मधून परेश पुनाजी आणि श्रीकांत चिकणेकर हे उमेदवार स्वत:चे भवितव्य आजमावत आहेत.

बाणावलीत होणार चौघांमध्ये लढत

दक्षिण गोव्यातील बाणावली जिल्हा पंचायत (मतदारसंघ 12) मधून चार उमेदवार रिंगणात उतरले असून फ्रँक फर्नांडिस (अपक्ष), ग्रेफान्स फर्नांडिस (अपक्ष), जोजफ पिमेंटा (आप) आणि रॉयला फर्नांडिस (अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.

आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान प्रारंभ होणार आहे. त्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. मतदानासाठी ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचा पासबूक, सरकारमान्य शैक्षणिक संस्थेतर्फे देण्यात आलेले फोटो ओळखपत्र यापैकी एखादा दस्तावेज ग्राह्य मानण्यात येणार आहे.

दरम्यान, उद्या दि. 24 रोजी सकाळी मतमोजणी प्रारंभ होणार असून त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.