For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा जिल्ह्यात ३४ थेट सरपंच, १७२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूकचे वाजले बिगुल

12:23 PM Mar 20, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्ह्यात ३४ थेट सरपंच  १७२ सदस्य पदांसाठी  पोटनिवडणूकचे वाजले बिगुल
Advertisement

                     सातारा जिल्ह्यात पोटनिवडणुकीचा शंखनाद!

Advertisement

गोडोली -राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य आणि थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता , इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २४४४ ग्रामपंचायतींचे ४७१ थेट सरपंच आणि ३१२० सदस्यांच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ३४ थेट सरपंच आणि १७२ सदस्य पदाच्या जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांची पारंपारिक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. तर ६ महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असलेल्या सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट सांगितले आहे.

Advertisement

जिल्ह्यातील पोटनिवडणूक कार्यक्रम

ग्रामपंचायती -१३८

एकूण जागा - २०६

थेट सरपंच रिक्त जागा- ३४

सदस्य रिक्त जागा - १७२

नामनिर्देशनपत्रे -७ ते १३ एप्रिल

छाननी, माघार- दि. १५ एप्रिल ते १७ एप्रिल

मतदानाचा दि. २८ एप्रिल

निकाल दि.२९ एप्रिल

मुदत संपत आलेल्या पदासाठी निवडणूक होणार नाही.ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा ठिकाणी या पोटनिवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.