For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी पोटनिवडणूक

06:04 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी पोटनिवडणूक
Advertisement

24 जुलैला होणार मतदान 

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी 24 जुलै रोजी होणार आहे. बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाचे तीन राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदु शेखर रॉय आणि प्रकाश चक बराइक यांनी राजीनामा दिला होता. या खासदारांचा कार्यकाळ ऑगस्ट 2029 पर्यंत होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागांकरता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

Advertisement

20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने बंगालमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या तीन जागांकरता पोटनिवडणूक घोषित केली. याकरता 7 जुलै रोजी अधिसूचना जारी होणार असून 14 जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत असेल. उमेदवारी अर्जांची छाननी 15 जुलै रोजी पार पडणार आहे. 17 जुलै ही अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत असणार आहे. तर 24 जुलै रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडेल, त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजल्यावर मतमोजणी सुरू होणार आहे.

बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांकरता पोटनिवडणूक घोषित करण्य ात आली असून यातील एक जागा सुखेंदु शेखर रॉय यांची आहे. रॉय यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. रॉय यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट 2029 पर्यंत होता. दुसरी जागा सुष्मिता देव यांनी 10 जून रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2030 पर्यंत होता. प्रकाश चिक बराइक यांनी 11 जून रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, त्यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट 2029 रोजी संपुष्टात येणार होता.

Advertisement
Tags :

.