For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर प्रदेश, पंजाब, केरळमध्ये पोटनिवडणूक तारखेत बदल

06:28 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर प्रदेश  पंजाब  केरळमध्ये पोटनिवडणूक तारखेत बदल
Advertisement

14 जागांवर 13 ऐवजी आता 20 नोव्हेंबरला मतदान : सणांमुळे वेळापत्रकात सुधारणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली. तीन राज्यांतील 14 विधानसभा जागांसाठी आता 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या जागांवरील मतमोजणी 23 नोव्हेंबरलाच होणार आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, आता उत्तर प्रदेशातील 9, पंजाबमधील 4 आणि केरळमधील एका विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजप, काँग्रेस, आरएलडी आणि बसपाच्या मागणीनुसार तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आणि गुऊनानक देवजींचे प्रकाशपर्व आहे. तर केरळमध्ये 13 ते 15 नोव्हेंबरदरम्यान कलापथी रास्तोलसेवाम साजरा केला जाणार असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केलेल्या 11 राज्यांतील 33 जागांसाठीच्या तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच 13 नोव्हेंबरलाच येथे मतदान होणार आहे. झारखंड विधानसभेच्या 43 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यासोबतच केरळच्या वायनाड लोकसभा जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र-झारखंडसह 14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभा जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 आणि झारखंडच्या 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरलाच मतदान होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभेसाठी एकाच दिवशी पोटनिवडणूक आहे.

Advertisement
Tags :

.