महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

किणये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी

10:14 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टाळ मृदंगाचा गजर : भजन, प्रवचन, कीर्तन : सात दिवस विविध कार्यक्रम : महाप्रसादाने सोहळ्याची सांगता

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ, मलप्रभा मुंगेत्री परिसर बेळगाव दक्षिण व पश्चिम विभाग किणये या मंडळाच्यावतीने आयोजित 37 व्या सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मंगळवारी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. सात दिवस बहाद्दरवाडी क्रॉस येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला. यामध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर, भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. टाळ मृदंगाच्या गजरात विठू माउली व ज्ञानेश्वर माउलीच्या जयघोषात वारकरी व भक्तमंडळी तल्लीन झाले होते. मंगळवारी दुपारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. मंगळवारी सकाळी कल्लेहोळ येथील निवृत्ती महाराज यांचे काला कीर्तन झाले. या काला कीर्तनात त्यांनी भगवान कृष्ण यांच्या बालपणातील विविध गोष्टी अध्यात्मिक स्वरूपात सांगितल्या. तसेच सध्याच्या कलियुगात नामस्मरणाला किती महत्त्व आहे, याची माहितीही वारकऱ्यांना पाठवून दिली. तसेच भगवंताचे नामस्मरण करा, असा संदेशही त्यांनी दिला. काला कीर्तनानंतर मंडपाभोवती दिंडी प्रदक्षिणा झाली. यावेळी वारकरी भजनात दंग झालेले पहावयास मिळाले. ज्ञानोबा माउली तुकाराम असा जयघोष सुरू होता. तसेच या दिंडी प्रदक्षिणेमध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. महिला फुगडी घालताना दिसत होत्या.

वै. दिगंबर पंत पऊळेकर महाराज टिळकवाडी व वै. माऊती पाटील नागरदळे यांच्या आशीर्वादाने हा 37 वा पारायण सोहळा झाला. या पारायणाचे अधिष्ठान अॅड. चंद्रकांत लोहार पिरनवाडी तर नामदेव सुतार नावगे यांनी उपअधिष्ठान सांभाळले. रोज पहाटे होणाऱ्या काकड आरतीला पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असत. वारकऱ्यांना सात दिवसाकरिता मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आले होते, अशी माहिती सरचिटणीस तानाजी डुकरे यांनी दिली. यल्लाप्पा नाईक, गजानन पाटील, नागेंद्र भारती किणये, पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी, तुकाराम पाटील महाराज किरहलसी, विलास पाटील किणये, सोपान तुकाराम काळे महाराज सातारा, माधव चरण प्रभुजी इस्कॉन, भगवंत धोंडोपंत शिरवळकर पंढरपूर आदींची प्रवचने व कीर्तने या पारायण सोहळ्यात झाली. सोमवारी सायंकाळी डॉ. विश्वनाथ पाटील महाराज यांचे प्रवचन झाले. यावेळी दीपोत्सव सोहळा झाला. रात्री भागवताचार्य येतीराज लोहोर महाराज आळंदी यांचे कीर्तन निरूपण झाले. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी ग्रंथ भजन आणि वारकरी याबद्दल आळंदीच्या या महाराजांनी आपल्या कीर्तनातून सविस्तर वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. पारायण मंडळाचे अध्यक्ष मष्णू माळी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन पुंडलिक दळवी, विजय डुकरे यांनी केले. सातेरी कोकितकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article