महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मात्र अद्यापही मुंबईकर धास्तीत

11:52 AM Nov 26, 2024 IST | Pooja Marathe
But Mumbaikars are still scared.
Advertisement

या वर्षात अनेक धमक्यांचे फोन

Advertisement

मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस कटीबद्ध

Advertisement

मुंबई: अमोल राऊत

राज्यात पुन्हा एकदा महायुतीने ना भुतो ना भविष्यती अशी कामगिरी केली आहे. 200 आकडा पार करीत महायुतीने इतिहास गाजविला. तर भारतीय जनता पार्टीने देखील 132 जागांवर विजय मिळवित अनोखा विक्रम केला. हे सर्व असतानाच देशाची आर्थीक राजधानी असलेले तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या महाभयंकर हल्ल्याला सोळा वर्षे पूर्ण झाली असताना देखील परिस्थितीत बदल झाला नाही. अद्यापही मुंबईकर याच धास्तीत जगत आहेत. त्यातच गेल्या वर्षभरापासुन मुंबई पोलीस तसेच वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर मुंबई तसेच विमानतळावर धमक्यांचे फोन येण्यस सुऊवात झाली आहे. महिन्यातुन दोन किवा त्यापेक्षा अधिक धमकीचे फोन मुंबई पोलिसांना येत आहेत. मात्र या सर्व अफवा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर या अफवा पसरविणाऱ्याच्या देखील मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. लांडगा आला रे आला अशी अवस्था होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस चोविस तास सतर्क आहेत. तरी देखील मुंबईकर अद्यापही धास्तीत आहेत.

कोणत्या वेळी काय होईल? आणि कोण बळी पडेल हे मुंबई पोलिसांना देखील सांगता येणार नाही अशी परिस्थिती शहरात आहे. या सोळा वर्षात मुंबई पोलीस दलात तसेच राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल झाले. एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने पाहता राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची पूर्णत: भंबेरी उडाली असून सुरक्षेचा मोठा गाजावाजा करणाऱ्या मुंबई पोलिसांचे प्रत्येकवेळी पितळ उघडे पडले आहे. मात्र त्यातुनही मुंबई पोलीस दल मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी कट्टीबद्ध असल्याचे सातत्याने समोर आले आहे.

राज्य सरकारने वेळोवेळी राज्याच्या तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मात्र अनेकदा राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी धुळखात पडले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला होण्याच्या दोन महिने आधी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा मिळाला होता. यावेळी तत्कालिन पोलीस आयुक्त दिवंगत हसन गफूर यांनी हा बंदोबस्त हलविला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच 26/11 हल्ल्याची नामुष्की ओढवली. पोलीस बंदोबस्त हटविला गेल्याची माहिती कराचीपर्यंत पोहचताच त्यानंतर ज्या वेगवान हालचाली झाल्या त्या म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात. त्यानंतर एकमेव जिंवत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्याकडुन सर्व वदवुन घेतले असता, अखेर पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. त्यानंतर कसाबवर खटला चालवुन अखेर त्याला 2013 साली फासावर लटकाविण्यांत आले.

अशावेळी पोलीस दलाला अत्याधुनिक यंत्रणेने सक्षम करण्यासाठी राम प्रधान समिती नेमली गेली. या समितीने रात्रीचा दिवस करून अभ्यास पूर्ण करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. याचा परिणाम म्हणजे या अहवालाला केराच्या टोपलीत बंदिस्त करण्यात आले. अखेर हा अहवाल बाहेर पडला आणि सरकारवर सर्व बाजूने टीकेचा भडीमार सुरू झाला. सरकारने नमते घेऊन काही अटी प्रधान समितीच्या मान्य करीत त्याची पूर्तता मुंबई पोलिसांना करण्यात आली. बुलेटप्रूफ व्हॅन असलेल्या मार्क्स व्हॅन, बॉम्ब तसेच अमलीपदार्थांची अचूक माहिती देणारी मोबाईल स्कॅनर व्हेईकल, बॉम्बसूट, बुलेटप्रूफ जॅकेट, स्पीड बोटी, आणि अत्याधुनिक शस्त्रs यांची पूर्तता काही प्रमाणात पोलिसांना करण्यास सुऊवात झाली.

बधवार पार्क अद्यापही भितीच्या छायेत
दरम्यान, पाकिस्तानातुन आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ज्या बधवार पार्क मधून मुंबईच्या जमिनीवर पाय ठेवले. तो बधवार पार्क सोळा वर्षानंतर देखील अद्यापही भितीच्या छायेखाली आहे. एखाद्या बोटीचा प्रकाश जरी दिसला तरी येथील नागरीकांच्या पोटांत गोळा येतो. यावेळी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन जातात. वर्षेभरातील आकडेवारी पाहिली तर बधवार पार्क येथुन संशयास्पद हालचाली संदर्भात अथवा बोट असल्यासंदर्भातील जवळपास 100 हुन अधिक फोन कॉल्स मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.

ताज, ओबेरॉय, ट्रायडंट मधील नोव्हेंबर महिन्यात कमी होणारे ग्राहक वाढले
हॉटेल ताज मध्ये सर्वात जास्त वेळ 26/11 हल्याचे ऑपरेशन सुऊ होते. यामुळे जगभरांत हॉटेल ताजला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. त्याचप्रमाणे, ट्रायडंट, आणि ओबेरॉयला देखील. यापुर्वी जसा नोव्हेबंर महिना उजाडतो, तसे या हॉटेलमधील ग्राहकांची संख्या तसेच परदेशी पर्यटकांची संख्या घटत होती. मात्र यावर्षी ताज, ऑबेरायला ग्राहकानी बऱ्यापैकी पसंती दिल्याचे समोर आले आहे.

सॅटेलाईट फोन तसेच ट्रॅक करणारी सिस्टिम उपलब्ध झाली
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी पाकिस्तानातुन आलेल्या कसाब गँगकडे ज्याप्रकारे सॅटेलाईट फोन उपलब्ध होते, तशा सॅटेलाईट फोनची मागणी मुंबई पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे केली. याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर सॅटेलाईल फोन मुंबई पोलिसांना उपलब्ध झाले. एवढेच नाही तर शहरात कोणी सॅटेलाईट फोनचा वापर करीत असेल, तर ते ट्रॅक करणारी प्रणाली देखील मुंबई पोलिसांना मिळाली. कधी नाही ते सातत्याने पाठपुरावा करीत ही यंत्रणा मुंबई पोलिसांच्या पदरात पडल्याने, या ठिकाणी मुंबई पोलिसांनी ताकद वाढली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article