For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिझी आहे, उपस्थित राहू शकत नाही!

06:34 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिझी आहे  उपस्थित राहू शकत नाही
Advertisement

मनीष सिसोदियांनी एसीबी चौकशीला टाळले : क्लासरुम घोटाळ्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या (एसीबी) चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला दिल्लीतील शाळांमध्ये क्लासरुम निर्मितीतील घोटाळ्यावरून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. सिसोदियांनी एसीबीला पाठविलेल्या उत्तरात आपण बिझी (व्यग्र) असल्याचे कळविले आहे.

Advertisement

एसीबीने आप नेते मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना चौकशीसाठी बोलाविले होते. जैन हे शुक्रवारी एसीबीसमोर हजर राहिले तर सिसोदिया यांना सोमवारी बोलाविण्यात आले होते. एसीबीने जैन यांची 5 तासांपेक्षा अधिक काळापर्यंत चौकशी केली होती.

सिसोदियांच्या वकिलाने ते सोमवारी हजर राहू शकणार नसल्याचे कळविले. यामुळे सिसोदियांना पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. एसीबीने याप्रकरणी 30 एप्रिल रोजी एफआयर नोंदविला होता, ज्यानंतर समन्स जारी करण्यात आले होते. आप नेत्यांच्या विरोधात दिल्लीच्या शाळांमध्ये 12 हजारांहून अधिक क्लासरुम निर्माण करण्याच्या कार्यात 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिसोदिया हे यापूर्वी अबकारी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जाऊन आले आहेत. सिसोदिया सध्या जामिनावर असून दिल्लीत पक्षाच्या पराभवानंतर पंजाबमध्ये पक्षाला मजबूत करू पाहत आहेत.

Advertisement
Tags :

.