For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यावसायिक रोहन हरमलकरला पुन्हा ईडीकडून अटक

12:23 PM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
व्यावसायिक रोहन हरमलकरला पुन्हा ईडीकडून अटक
Advertisement

चौदा दिवस ईडीच्या कोठडीत रवानगी : हणजूण येथील जमीन हडपप्रकारण

Advertisement

पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी हडप केल्याप्रकरणी चर्चेत असलेला दिवाडी बेटावरील व्यावसायिक रोहन हरमलकर याला अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये अटक केली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला 14 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने गोव्यात आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी केली. यात पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आदी ठिकाणी छापे टाकून हणजूण, हडफडे, आसगाव परिसरातील जमिनींची बनावट कागदपत्रे तसेच सुमारे 1600 कोटींच्या स्थावर मालमत्तांचे दस्तऐवज जप्त केले आहे. या छाप्यावेळी पिळर्णमधील हरमलकर यांच्या घरालाही टाळे ठोकण्यात आले आहे.

कॅनडाच्या पिंटो यांची तक्रार

Advertisement

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जमीन हडप केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण येथील सर्वे क्रमांक 444/8 मधील 2,450 चौ. मी. जमीन संर्दभात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कॅनडा येथे स्थायिक जॉयसे एझाबेल पिंटो यांच्यातर्फे मुखत्यारपत्रधारक आंतोनियो डिकॉस्टा यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती.

हणजूणमधील जमीन 

तक्ररीनुसार पिंटो यांची हणजूण येथे सर्व्हे क्रमांक 444/8 मधील 2,450 चौ.मी. वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन संशयित व्यावसायिक रोहन हरमलकर (गोलती - नावेली, दिवाडी तिसवाडी), मॅथ्यू डिसोझा (मुंबई), देवानंद कवळेकर (पिर्ळण), पीटर वाझ (हणजूण), फेलिक्स नोरोन्हा (शापोरा), धुळेर - म्हापसा येथील अल्कांत्रो डिसोझा, जुन डिसोझा, आर्किबाल्ड डिसोझा, थेरेझा डिसोझा, मॅक्सी डिसोझा, टीना डिसोझा, वॅरोनिका डिसोझा यांनी षड्यांत्र रचून बनावट दस्तावेज तयार करून धुळेर म्हापसा येथील डिसोझा याच्या नावावर करून घेतली. त्या जमिनीबाबत रोहन हरमलकर याने डिसोझा कुटुंबियांसोबत करार केला. 28 जानेवारी 2019 रोजी ती जमीन हरियाणा येथील आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विकली.

या तक्रारीची दखल घेऊन एसआयटीने गुन्हा दाखल केला होता. एसआयटीने देवानंद कवळेकर याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. बार्देशचे निबंधक अर्जुन शेट्यो यांनी हणजूण येथील सर्वे क्रमांक 426/5 मधील जमीन हडप केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसस्थानकात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. दोन्ही गुह्यांची दखल घेऊन ईडीने चौकशी करुन ही कारवाई केली.

Advertisement
Tags :

.