मिरज रेल्वे स्थानकात व्यावसायिकाचा खून
मिरज :
येथील मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्रमांक दोनवर दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून भंगार गोळा करणाऱ्या एकाचा रेल्वे रुळावर डोके आपटून निर्घृण खून करण्यात आला. सतिश बाबूराव मोहिते (वय 40, रा. शंकर-विजय स्वॉ मील इचलकरंजी रोड, हातकणंगले) असे खून झालेल्याचे नांव आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संशयीत संतोष दुर्गा निंबाळकर याला मिरज लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री सतिश मोहिते व संशयीत संतोष निंबाळकर रेल्वे जंक्शनवरील फलाट क्रमांक दोनवर नशा करुन बसले होते. दारुसाठी पैसे देवाण-घेवाणीच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संशयीत संतोष निंबाळकर याने सतिश मोहितेला काठीने मारहाण केली. त्यानंतर जोरात ढकलून दिले. रेल्वे रुळावर डोके आपटून मारहाण झाल्याने सतिशच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू होता. रेल्वेच्या हेल्थ इन्स्पेक्टर विभागासमोरच ही घटना घडली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. जखमी सतिशला मिरज शासकीय ऊग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा कऊन रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयीत संतोष निंबाळकर याला अटक केली आहे. दोघेही भंगार विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्रीही दोघे कचरा गोळा करण्यासाठी आले होते. नशेतच दाऊच्या पैशांसाठी दोघांमध्ये भांडण होऊन मारहाणीदरम्यान हा खून झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले. त्यानुसार मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.