For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुक्केरीच्या व्यावसायिकाला 37 लाखांचा ऑनलाईन गंडा

12:00 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुक्केरीच्या व्यावसायिकाला 37 लाखांचा ऑनलाईन गंडा
Advertisement

पैसे गुंतविल्यास अधिक लाभाचे आमिष

Advertisement

बेळगाव : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक लाभ मिळेल, असे आमिष दाखवून हुक्केरी येथील व्यावसायिकाला भामट्यांनी सुमारे 37 लाख 48 हजार 965 रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सोमवार दि. 5 रोजी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची कॅनरा आणि कर्नाटक ग्रामीण बँकेत दोन खाती आहेत. त्यांनी सदर खात्यांना आपला मोबाईल क्रमांक लिंक केला आहे. 20 जून 2025 रोजी फिर्यादीच्या मोबाईलवर 9 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. आमची क्युट्रो-एआय कंपनी आहे. कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक लाभ मिळेल, असे सांगून फिर्यादीची माहिती घेण्यात आली.

त्यानंतर त्याच्या नावे एक ऑनलाईन खाते उघडून एक लिंक पाठविण्यात आली. सदर लिंक ओपन करून पाहिली असता त्यामध्ये फिर्यादीला पैसे गुंतविण्यासह त्या मोबदल्यात मिळणाऱ्या लाभासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने 20 जून 2025 ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या केव्हीजी आणि कॅनरा बँक खात्यातून एकूण 37 लाख 54 हजार 106 रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग केले. यावेळी फिर्यादीला 5141 रुपये काढून घेण्याची संधी देण्यात आली. सदर नैज कंपनी आहे असे सांगून 37 लाख 54 हजार 106 रुपये घेण्यात आले. तर 5141 रुपये परत देण्यात आले. अद्याप 37 लाख 48 हजार 965 रुपये परत न देता फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.