For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात उद्योजकाची आत्महत्या

06:10 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात उद्योजकाची आत्महत्या
Advertisement

प्राप्तिकर विभागाच्या सततच्या छाप्यांमुळे घाबरून कृत्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक आणि कॉन्फिडेट ग्रुपचे संस्थापक चेअरमन डॉ. सी. जे. रॉय (वय 57) यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. प्राप्तिकर विभागाच्या सततच्या छाप्यांना घाबरून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी देखील त्यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली होती. याच दरम्यान, त्यांनी गनमधून स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उद्योग जगतात खळबळ माजली आहे. मुळचे केरळमधील रहिवासी असणारे सी. जे. रॉय यांनी बेंगळूरच्या रिचमंड सर्कलजवळील लँडफोर्ड रोडवरील कार्यालयात ही घटना घडली आहे. शुक्रवारी देखील प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी लँडफोर्ड ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले. मागील तीन वर्षांपासून त्यांच्यामागे प्राप्तिकर विभागाचा ससेमीरा लागला होता. सततच्या छाप्यांमुळे घाबरून रॉय यांनी शुक्रवारी नगमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

शुक्रवारी दुपारी कंपनीच्या कार्यालयात आलेल्या सी. जे. रॉय यांची प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तासभर चौकशी केली. चौकशीवेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रेही सुपूर्द केली. आणखी कागदपत्रे आणण्यासाठी ते रुममध्ये गेले. याचवेळी त्यांनी आत्महत्या केली. गनचा आवाज आल्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी रुमकडे धाव घेतली. रॉय यांना तातडीने इस्पितळाकडे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अशोकनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. रॉय यांनी आत्महत्येसाठी गन, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली का, याचाही शोध घेतला जात आहे. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात येत आहेत. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सी. जे. रॉय यांच्या पश्चात पत्नी लिनी रॉय, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. रॉय यांच्या नावावर अनेक मोठी हॉटेल्स व रिसॉर्ट आहेत. बेंगळूरमधील नामवंत रिअल इस्टेट उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. स्वित्झर्लंडच्या एसबीइस बिझनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासन विषयात डॉक्टरेट मिळविली होती. विदेशात शिक्षण घेतल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. 2005 मध्ये कॉन्फिडन्ट ग्रुप कंपनी स्थापन केली. या कंपनीने 65 पेक्षा अधिक आलिशान योजना पूर्ण केल्या अपार्टमेंट, व्हिला, वाणिज्य संकुल, शिक्षण संस्था, सर्किट हाऊस निर्मिती केल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातही या कंपनीचे योगदान आहे. बेंगळूर, केरळबरोबरच दुबईतही त्यांनी उद्योगाचा विस्तार केला होता. स्लोवाक रिपब्लिकचे मानद कॉन्सुल म्हणूनही त्यांनी काम केले होते.

Advertisement
Tags :

.