For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

​​माडखोल पुलाच्या खांबावर वाढलेल्या झुडपांमुळे पूलाला धोका

04:05 PM Apr 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
​​माडखोल पुलाच्या खांबावर वाढलेल्या झुडपांमुळे पूलाला धोका
Advertisement

पं. स. सदस्या सौ अवनी राऊळ यांनी वेधले बांधकाम खात्याचे लक्ष

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

सावंतवाडी - बेळगाव या आंतरराज्य महामार्गावरील माडखोल फुगी बाजार नजीक येथील ब्रिटिश कालीन पुलाच्या दगडी खांबाना झाडाझुडपांनी वेढले असून या पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन या दगडी खांबावर वाढलेली झुडपे तोडून पुलाला निर्माण झालेला धोका टाळावा अशी मागणी माडखोल पंचायत समिती सदस्या सौ अवनी अमित राऊळ यांनी बांधकाम खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे केली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पुल असून ब्रिटिशकालीन आहे. दगडी खांबावर पुल असून या दगडी खांबाच्या मुळात आणि वर झाडे झुडपे उगवली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने ही झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. पर्यायाने या ब्रिटिश कालीन पुलाला धोका निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास हा पुल कमकुवत होऊन या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता भविष्यात कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची वेळीच दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य सौ. अवनी राऊळ यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.