For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 नोव्हेंबरपासून बस तिकीट दरात होणार वाढ

06:22 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
5 नोव्हेंबरपासून बस तिकीट दरात होणार वाढ
Advertisement

भाडेवाढीचा अंतिम निर्णय 4 नोव्हेंबरला : परिवहन मंत्री भैरती सुरेश यांची माहिती

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील परिवहन महामंडळांच्या बस तिकीट दरात 5 नोव्हेंबरपासून वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री भैरती सुरेश यांनी रविवारी दिली. चिक्कबळ्ळापूर येथे पत्रकारांशी बोलताना, डिझेल दरवाढीमुळे राज्यातील चारही परिवहन महामंडळांना दरवषी सुमारे दोन हजार कोटी ऊपयांचा अतिरिक्त आर्थिक फटका बसत आहे. महामंडळांना आतापर्यंत नऊ हजार कोटी ऊपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे बस प्रवासाचे भाडे वाढविणे अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भाडेवाढीच्या विषयावर चर्चा झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि परिवहन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार 4 नोव्हेंबर रोजी परिवहन विभागाचे अधिकारी आणि चारही परिवहन महामंडळांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत किती टक्के भाडेवाढ करायची, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू करण्यात येतील, असे मंत्री सुरेश यांनी सांगितले.

सुधाकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर

बस भाडेवाढीवरून खासदार डॉ. सुधाकर यांनी केलेल्या टीकेलाही भैरती सुरेश यांनी प्रत्युत्तर दिले. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील बस प्रवासाचे दर कमी असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपच्या सत्तेतील राज्यांमधील बस भाड्याची तुलना करूनच टीका करावी. तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळांना बंद करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दूध दरवाढीचे समर्थन

दूध दरवाढीवरून भाजपने आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. वाढविण्यात आलेल्या प्रतिलिटर आठ ऊपयांपैकी सात ऊपये थेट शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. भाजपची भूमिका शेतकरीविरोधी असून आगामी निवडणुकीत शेतकरीच त्यांना धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.