गुजरातमध्ये पुरात अडकली बस
27 यात्रेकरूंची सुटका : पाँडिचेरी-तामिळनाडूतील प्रवासी
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्या, नाले तुंबले आहेत. भावनगरमधील मालेश्री नदीत गुऊवारी रात्री उशिरा एक खासगी बस अडकली. बसमध्ये पाँडिचेरी-तामिळनाडूतील 27 यात्रेकरूंसह 29 जण होते. यादरम्यान लोकांना वाचवण्यासाठी गेलेला ट्रकही नदीत अडकला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत व बचाव पथकाने सुमारे 8 तासांच्या अथक परिश्र्रमानंतर सर्वांची सुटका केली.
गुजरातमधील भावनगर जिह्यात पुरामुळे लोकांची दैना झाली आहे. याचदरम्यान भावनगरमधील मालेश्री नदीच्या पुरात वाहून गेल्याने 27 यात्रेकरूंच्या समुहाला वाचवण्यात आले. भावनगर तालुक्मयाच्या समुद्र किनाऱ्यावरील निश्कलंक महादेव मंदिराजवळ सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टी होत असताना ही घटना घडली. यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू केले, असे भावनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बस पूरमय रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात ती वाहून गेली. पाँडिचेरी आणि तामिळनाडूतील 27 यात्रेकरूंना घेऊन ही बस गुजरातमध्ये आली होती.