For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शैक्षणिक सहली, पर्यटनासाठी बस सज्ज

11:03 AM Nov 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक सहली  पर्यटनासाठी बस सज्ज

परिवहनच्या बससाठी बुकिंग आवश्यक : सवलतीच्या दरात आरामदायी प्रवास : शैक्षणिक सहलींचे नियोजन सुरू

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा परिवहनचा व्यवसायी हंगाम आहे. या काळात शैक्षणिक सहली आणि पर्यटनस्थळांना भेट देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. मागील दोन शैक्षणिक सहली आणि पर्यटनस्थळे बंद होती. मात्र, यंदा सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे सहली आणि पर्यटनस्थळांसाठी परिवहनने जादा बस सज्ज केल्या आहेत.

Advertisement

सुरक्षितता आणि इतर कारणांमुळे शाळांच्या शैक्षणिक सहलींसाठी परिवहनच्या बसला पसंती दिली जाते. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सहलींसाठी विविध मार्गांवर जादा बस धावतात. त्यामुळे परिवहनला शैक्षणिक सहली आणि पर्यटनाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न प्राप्त होते. कोरोनामुळे गत दोन वर्षात अधिक उत्पन्नही थांबले होते. मात्र, यंदा सहली आणि पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नही पूर्ववत होईल, अशी आशा परिवहनला आहे.

Advertisement

परराज्यात जाण्यासाठी परवानगी आवश्यक

दैनंदिन प्रवाशांसाठी 700 हून अधिक बस बेळगाव विभागातून धावतात. हंगामी काळात दैनंदिन 25 ते 30 बस विविध पर्यटनस्थळे आणि सहलींसाठी धावत असतात. बेळगाव विभागातून दररोज 15 हून अधिक बस सहलींसाठी विविध रस्त्यांवर धावतात. यंदा पर्यटनस्थळे खुली झाल्याने शैक्षणिक सहलींचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेस सहलींसाठी बुकिंग केल्या जाणार आहेत. परराज्यात सहलींचे नियोजन करणाऱया शाळा व्यवस्थापनाला 10 दिवस अगोदर बस बुक करावी लागणार आहे. गोवा, महाराष्ट्र आणि इतर परराज्यात जाण्यासाठी परिवहनला परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सहलींचे नियोजन करणाऱयांनी परिवहनला 10 दिवस अगोदर माहिती देणे आवश्यक आहे.

जादा बस सोडण्याचे नियोजन

गत दोन वर्षात बससेवा जागेवर थांबून राहिल्याने परिवहनला कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे परिवहन आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धडपड करत आहे. हंगाम काळात विविध मार्गांवर जादा बस सोडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ यासह महाराष्ट्रातील महाबळेश्वर, गडकिल्ले आणि गोव्याला भेट देणाऱया पर्यटकांची संख्या अधिक असते. यासाठी या काळात जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. या सहली विशेषतः लांब ठिकाणी काढल्या जातात. दरम्यान, सुरक्षितता आणि इतर बाबींचा विचार करून परिवहन बसला सहलीसाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे शैक्षणिक सहलींतून समाधानकारक उत्पन्न प्राप्त होईल, अशी आशा परिवहनला आहे.

कोरोना काळात फटका

कोरोना काळात शाळा-महाविद्यालये बंद होती. शिवाय पर्यटनावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे दोन वर्षात परिवहनचा व्यावसायिक हंगाम बुडाला होता. यंदा शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. शिवाय पर्यटनस्थळे खुली केली आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जात आहे.

Advertisement
Tags :
×

.