महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रस्ता दुरूस्तीसाठी बसमालकाचे अभिनव आंदोलन

06:49 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आसगाव रस्त्यावरील खड्ड मध्ये बसून केला निषेध- आठ दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा उपोषण

Advertisement

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisement

बार्देश तालुक्यातील आसगाव गावात डीएमसी कॉलेज ते आसगाव दरम्यान संपूर्ण रस्ता ख•dयांनी भरलेला आहे. येथे रस्त्यावर ख•s की ख•dयांमध्ये रस्ते आहेत हे समजत नाही. शनिवारी एक त्रस्त बसमालक श्याम गोवेकर (शापोरा) यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत आसगाव येथे रस्त्यालगत खासगी बसेस पार्क करून रस्त्यावर पडलेल्या ख•dयांमध्ये बसून आंदोलन केले. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने येथील रस्त्यावरील ख•s दगड वा मातीने बुजवावे अन्यथा आपण पंचायतीसमोर याप्रश्नी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यंदाच्या पावसात आसगाव येथील मुख्य रस्त्याची अत्यंत चाळण झाली असून जागोजागी ख•dयांचे साम्राज्य पसरले आहे. आठ दिवसांत येथील रस्त्याची युद्धपातळीवर दुऊस्ती करावी अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा बसमालक श्याम गोवेकर यांनी दिला आहे. आसगावच्या पंचायत कार्यालयासमोर श्याम गोवेकर तसेच इतरांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

या ऊटवरील खासगी बसेसना सहा महिन्यांहून अधिक काळ या ख•dयांमुळे मनस्ताप तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ख•dयांमुळे अनेकदा खासगी बसेस रस्त्यात बंद पडतात तसेच सुटेभाग वारंवार नादुऊस्त होत असल्याने बसमालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे गोवेकर यांनी यावेळी सांगितले. खासगी बसेसच्या मालकांना कदंबा बसेसप्रमाणे सरकारी वाली नसतो त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय परवडेल की नाही अशी शंका बोलून दाखविली.

रस्त्यांची दुर्दशा सहनशिलतेच्या पलीकडे गेल्याने रस्त्यावर उतरणे भाग पडले असल्याचे चालक म्हणाले. आसगाव ते कॉलेजपर्यंतच्या रस्त्याची ख•dयांमुळे चाळण झाली आहे. आसगाव पंचायत क्षेत्रात भूमीगत वीजवाहिन्या तसेच जलवाहिन्या बसवण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर खराब झालेले रस्ते योग्य पद्धतीने दुऊस्त न करता निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सतत पडणाऱ्या पावसात रस्ते खराब झाले आहेत. त्यातून बस चालवणे त्रासदायक ठरत असल्याचे आंदोलन करणाऱ्या बसमालकांनी सांगितले. नादुऊस्त रस्त्यांवर अपघात वाढले असून दुऊस्तीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रमजान शेख यांनीही  नाराजी व्यक्त करत निषेध केला.

आपण कोणालाच दोष देत नाही पण यावर सरकारने तोडगा काढण्याची विनंती श्याम गोवेकर यांनी केली. लोकांना प्रवास करताना होणारा त्रास जाणून घेण्यासाठी आपण पंचायतीच्या सर्व पंचसदस्यांना बसमध्ये बसवून म्हापसापर्यंत प्रवास करण्याची विनंती केल्याचेही ते म्हणाले. प्रवासातून कोणता अनुभव येतो याचे कथन करावे, असेही गोवेकर म्हणाले.

खासगी बस बिघडली तर आम्ही दुसरी आणू शकत नाही :  कविता चंदन बेतकर 

बसमालक कविता चंदन बेतकर म्हणाल्या की, येथे कदंब बसेस ये-जा करीत असतात. एक बिघडली तर दुसरी पाठवून देतात. आमची खासगी बस बिघडली तर आम्ही दुसरी आणू शकत नाही. कारण ऊटसाठी त्याच नंबरची गाडी पाहिजे. आम्हाला कर भरायला पाहिजे. या भागातील खासगी प्रवासी बसेसवर कंडक्टर नियुक्त करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आपण स्वत: बसवर कंडक्टर म्हणून राबत असल्याचे  कविता चंदन बेतकर या महिला कंडक्टरने सांगितले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article