For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात बस अन् ट्रकची टक्कर, 6 जणांचा मृत्यू

06:37 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात बस अन् ट्रकची टक्कर  6 जणांचा मृत्यू
Advertisement

मृतांमध्ये 5 महिला सामील : 12 प्रवासी जखमी

Advertisement

वृत्तसंस्था, सूर्यापेट

तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एका इलेक्ट्रिक बसने मागून ट्रकला टक्कर मारली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. संबंधित बसमधून 43 जण प्रवास करत होते आणि ही बस हैदराबाद येथून आंध्रप्रदेशच्या एलुरूच्या दिशेने जात होते. दुर्घटना सकाळी 5.15 वाजता हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर कोडाडनजीक घडली आहे.

Advertisement

ट्रकमधून लोखंडी पिलरची वाहतूक केली जात होती बसने टक्कर मारताच ट्रकमध्ये पिलरला बांधून ठेवणारी साखळी तुटली होती, यानंतर पिलर बसच्या डाव्या भागात घुसले आणि याचमुळे समोरच्या बाजूला बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेचे कारण भरधाव वेग असू शकतो. बसची टक्कर होण्यापूर्वी ट्रक रस्त्यावरील दुभाजकाला धडकला होता असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आंध्रप्रदेशच्या विजयवाडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना जखमींना चांगली उपचार सुविधा मिळवून देण्याकरता आवश्यक पावले उचलण्याचा निर्देश दिला आहे.

Advertisement
Tags :

.