केनियात बस अन् ट्रकची टक्कर, 22 जणांचा मृत्यू
नैरोबी : केनियातील मुख्य महामार्गावर रविवारी सकाळी एक प्रवासी बस आणि ट्रक यांची भीषण टक्कर झाली असून या दुर्घटनेत कमीतकमी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनसार या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती माकुएनी काउंटी आयुक्त अब्दुल्लाही खलीफ यांनी व्यक्त केली आहे. बसमधील प्रवासी एका अंत्यसंस्कारातून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. राजधानी नैरोबीला कनारी शहर मोम्बासाशी जोडणाऱ्या या महामार्गावर झालेल्या दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु केनियात भरधाव वेग आणि रस्त्यांची खराब अवस्था अशा मोठ्या दुर्घटनांचे मुख्य कारण मानले जाते. केवळ 3 आठवड्यांपूर्वी याच महामार्गावर अन्य एका दुर्घटनेत 17 जणांनी जीव गमावला होता. महामार्गाचा हिस्सा एक अॅक्सिडेंट ब्लॅक स्पॉट असून येथे सुरक्षा सुधारणांसाठी यापूर्वी अनेक शिफारसी करण्यात आल्या होत्या.