For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिरीयात बस अपघात : 35 ठार

06:45 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिरीयात बस अपघात   35 ठार
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

दामास्कस (सिरीया)

सिरीयाची राजधानी दामास्कस (दमिष्क) येथील एका महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात किमान 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी समोरासमोरुन येणाऱ्या दोन बस एकमेकींवर आदळून झाला आहे. या महामार्गावर एक प्रवासी बस आणि एक देशाच्या गृहविभागाची एक बस यांची समोरासमोर टक्कर झाली. यामुळे दोन्ही बसेसचा चुराडा झाला आहे. दोन्ही बसेसमधील अनेक प्रवासी ठार झाले, तर 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

हा अपघात इतका भीषण होता, की महामार्गावर प्रवाशांच्या रक्तामांसाचा चिखल झालेला होता. कित्येक तास महामार्गावरील वाहतूक बंद होती. मृतदेह मार्गावरुन इतरत्र नेण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात पोहचविण्यासाठी सेनादलाची हेलिकॉप्टर्स उपयोगात आणण्यात येत आहेत. बसेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी विशेष यंत्रणा उपयोगात आणली जात आहे. सिरीयात गेल्या पन्नास वर्षांमध्ये झालेल्या सर्वाधिक भीषण अपघातांपैकी हा एक मानला जातो.

Advertisement
Tags :

.