For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसच्या धडकेत अस्नोडा येथे पती ठार, पत्नी गंभीर जखमी

12:48 PM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बसच्या धडकेत अस्नोडा येथे पती ठार  पत्नी गंभीर जखमी
Advertisement

म्हापसा : राज्यातील रस्ते अपघातांची मालिका नव्या वर्षातही सुरूच आहे. शुक्रवारी म्हापसा  ते अस्नोडा मार्गावर अस्नोडा येथे बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मीकांत ऊर्फ घटू शेटकर (45, रा. खोजुर्वे हळदोणे) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी स्मृती शेटकर (38) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले आहे. पोलिसांनी बसचालक तुकाराम सावंत (रा. माशेल) याला अटक केली आहे. अस्नोडा येथील सेंट क्लारा स्कूलजवळील क्रीडा संकुलानजीकच्या कपेलजवळ शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला. सांखळी येथे राहणारे लक्ष्मीकांत हे पत्नीसह दुचाकीवरून अस्नोडातून म्हापशाच्या दिशेने येत होते. पणजी ते वाळपई ही बस म्हापसा, अस्नोड्यावरून वाळपईच्या दिशेने जात होती, त्यावेळी हा अपघात घडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.