महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादाला पाताळात गाडू : अमित शाह

06:15 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नौशेरा येथी जाहीर सभा : पाकिस्तानला दिला इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नौशेरा

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नौशेरा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली आहे. या सभेत बोलताना शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी दगडफेक करणाऱ्यांची आणि दहशतवाद्यांची मुक्तता करू इच्छित असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.

फारुख अब्दुल्ला हे जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये दहशतवादाला पुनरुज्जवीत करण्याबद्दल बोलतत आहेत. परंतु मोदी सरकार असताना हे शक्य होणार नसल्याचे त्यांना ठणकावून सांगू इच्छितो. आम्ही दहशतवादाला पाताळात गाडणार आहोत. कुठलाही दहशतवादी किंवा दगडफेक करणाऱ्याला सोडले जाणार नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जोपर्यंत दहशतवादाचे उच्चाटन होत नाही तोवर पाकिस्तानसोबत चर्चा होणार नसल्याचे फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना सांगू इच्छितो. मी माझ्या जम्मू-काश्मीरच्या युवांसोबत बोलणार आहे, पाकिस्तानसोबत नाही. पाकिस्तानने जर गोळीबार केला तर आम्ही तोफगोळ्यांद्वारे प्रत्युत्तर देऊ असे शाह यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी लक्ष्य

अमित शाह यांनी आरक्षणावरून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. कुणालाही पहाडी, गुज्जर, दलित आणि अन्य मागास वर्गांसमवेत वंचित वर्गांना देण्यात आलेल्या आरक्षणाला स्पर्श करण्याचीही अनुमती दिली जाणार नाही. राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले आहे. परंतु आम्ही राहुल गांधी यांना मागास समुदायांसाठीचे आरक्षण हटवू देणार नसल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article