For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इटलीत बुरखा, नकाबवर येणार बंदी

06:22 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
इटलीत बुरखा  नकाबवर येणार बंदी
Advertisement

सध्या 24 देशांमध्ये बंदी : शाळांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार

Advertisement

  वृत्तसंस्था, रोम

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शाळांमध्ये बुरखा आणि नकाब परिधान करण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी मंत्रिमंडळ लवकरच प्रस्तावावर निर्णय घेणार आहे. शाळांमध्ये चेहरा झाकलेला असू नये अणि कुठल्याही परंपरेच्या नावावर चेहरा झाकण्याचा दबाव टाकला जाऊ नये असे मेलोनी यांनी म्हटले आहे.

Advertisement

याचबरोबर मेलोनी सरकारने शाळांमध्ये विदेशी विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित नियमांच्या अंतर्गत अशा विदेशी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना इटालियन भाषा शिकावी लागेल, ज्यांच्या मुलांना शाळेत  इतर विद्यार्थ्यांसोबत मिसळण्यास आणि इटलीतील शिक्षण व्यवस्थेत सामील होण्यास अडचणी येत आहेत.

बुरखा आणि नकाबवर बंदी घालणारा इटली हा पहिला युरोपीय देश नसेल. फ्रान्स आणि चीनसमवेत जगातील सुमारे 24 देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणाऱ्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू आहेत.

इटलीतील बंदी

इटलीत चेहरा झाकण्यावर 1975 पासून कायदा आहे. याच्या अंतर्गत सार्वजनिक कुठल्याही व्यक्तीची ओळख पटणार नाही अशाप्रकारे चेहरा झाकण्यास मनाई आहे. परंतु काही परिस्थितींमध्ये सूट दिली जाऊ शकते. जर कुणी व्यक्ती धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणामुळे चेहरा झाकत असेल तर केवळ यामुळे त्याला कायद्याचा भंग मानले जाणार नाही, प्रकरणाच्या परिस्थितींनाही पाहिले जाईल ए 2008 साली एका न्यायालयाच्या निर्णयात म्हटले गेले होते. आता मेलोनी सरकार शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर स्वतंत्रप्रकारे बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकारच्या मंजुरीनंतर प्रस्तावाला संसदेत मांडले जाईल. संसदेत 60 दिवसांच्या आत मंजुरी मिळविणे आवश्यक असणार आहे.

अधिक जहाल नेत्याची एंट्री

इटलीत पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार असून इमिग्रेशन म्हणजेच स्थलांतरितांचा मुद्दा तेथे मुख्य राजकीय मुद्दा ठरला आहे. मेलोनी यांचा पक्ष ब्रदर्स ऑफ इटलीला (एफडीआय) आता नॅशनल फ्यूचरच्या (एफएन) नेत्याकडून आव्हान मिळतेय. हा पक्ष मेलोनी यांच्या पक्षापेक्षाही अधिक कठोर इमिग्रेशन धोरणाची मागणी करणारा आहे. एफएनने जुलै महिन्यात शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

9.3 लाख विदेशी विद्यार्थी

इटलीच्या शाळांमध्ये देशाचे नागरिकत्व नसलेले सुमारे 9.3 लाख विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजेच शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमध्ये सुमारे 19 विद्यार्थी विदेशी नागरिक आहेत. या मुलांच्या संख्येनंतरही इटलीतील विदेशी अल्पवयीनांची एकूण संख्या मागील 10 वर्षांमध्ये सुमारे 4.5 टक्क्यांनी कमी झाली आहे.

Advertisement
Tags :

.