For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीड कोटीच्या मर्सिडीजचे दफन

06:46 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दीड कोटीच्या मर्सिडीजचे दफन
Advertisement

विचित्र घटना घडणाऱ्या देशांमध्ये चीन अग्रेसर आहे. आपण कदाचित कल्पनाही करु शकणार नाही, अशा घटना या देशात घडत असतात. सध्या चर्चेत असणारी अशीच एक घटना या देशाच्या लियाओलांग या भागात घडली आहे. येथे काही दिवसांपूर्वी 70 वर्षांच्या एका व्यक्तीचे निधन झाले. चीनमध्ये बव्हंशी निधनानंतर दफन करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे या व्यक्तीच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. त्याच्यासह त्याच्या दीड कोटी रुपये किमतीच्या अलिशान मर्सिडीझ कारचेही दफन करण्यात आले. सध्या या घटनेचा सर्वत्र बोलबाला आहे.

Advertisement

मर्सिडींझ बेंझ कारचे दफन करण्यासाठी एका मोठा ख•ा खोदण्यात आला. या खड्डयाच्या एका बाजूला या व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला. मर्सिडीझ बेंझ कारला तांबड्या रंगाची रिबन बांधून सजविण्यात आले आणि खड्डयाच्या दुसऱ्या बाजूला तिला पुरण्यात आले. पुरण्यासाठी या कारला क्रेनच्या साहाय्याने ख•dयात उतरविण्यात आले आणि नंतर या मृत व्यक्तीच्या सर्व कुटुंबियांनी मूठमाती देऊन खड्डा बुजवला. व्यक्तीच्या मृतदेहासमवेत कारला पुरण्याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांनी विचारला. याचे एक विशेष कारण असल्याचे उत्तर कुटुंबियांनी दिले.

या व्यक्तीला महागड्या कार खरेदी करण्याची भारी हौस होती. त्याच्याकडे अनेक कार्सचा संच होता. तो पुष्कळ श्रीमंत असल्याने आपली ही हौस तो सहजगत्या भागवू शकत होता. त्याच्या मृत्यूनंतरही त्याची ही हौस त्याला भागविता यावी. कारचा विरह त्याला सहन करावा लागू नये, म्हणून त्याची सर्वात आवडती कार त्याच्यासह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला. या निर्णयाचे तार्किक विश्लेषण कोणी करु शकणार नाही. तथापि, हा भावनेचा प्रश्न असल्याने त्याच्याकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. हजारो वर्षांपूर्वी इजिप्त या देशात राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहासह त्याच्या दासदासींनाही पुरण्याची प्रथा होती. तसेच राजाची आभूषणे, वस्त्रे आणि सोन्याचांदीची भांडीही पुरली जात असत. पुढच्या जन्माला राजाला त्यांचा उपयोग होईल, अशी समजूत होती. आता 21 व्या शतकातही अनेकांची अशी समजूत असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहासह त्याच्या आवडत्या वस्तू पुरण्याची पद्धती आजही तुरळक प्रमाणात काही देशांमध्ये पाळली जाते. चीनमधील ही घटना अशाच प्रकारची मानली जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.