For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

इंडालनगर-शिंदोळीमध्ये तीन लाखांची घरफोडी

07:30 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडालनगर शिंदोळीमध्ये तीन लाखांची घरफोडी
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

इंडालनगर, शिंदोळी येथील एका बंद घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे 3 लाखांचे दागिने पळविले आहेत. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

उमा महांतेश गोडचीमठ यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. रविवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. इंडालनगर येथील घराच्या पूर्वेकडील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला आहे. तिजोरीतील 55 ग्रॅम सोने व 50 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे. त्यामध्ये गंठण, कर्णफुले, अंगठी, चांदीचा छल्ला आदी दागिन्यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.