For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमननगर येथे 4 लाखांची घरफोडी

06:55 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमननगर येथे 4 लाखांची घरफोडी
Advertisement

बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकडसह कपड्यांवर डल्ला

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महिलांचे कपडे अशा एकूण 3 लाख 81 हजार 500 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. सोमवार दि. 21 रोजी सकाळी 11 च्या सुमारास केजीएन गल्ली, सहावा क्रॉस अमननगर येथे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी सलीम अब्दुलसत्तार मुजावर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

Advertisement

फिर्यादी हे रविवार दि. 21 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास आपल्या घराला कुलूप घालून देशनूर येथील नातेवाईकांच्या घरी गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील सेल्फावर ठेवण्यात आलेल्या लहान बॅगेतील 3 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 33 हजार रुपयांची रोकड आणि 3 हजार 500 रुपये किमतीचे महिलांचे सात जोड कपडे पळविले आहेत.

फिर्यादी सोमवार दि. 21 रोजी सकाळी 11 च्या सुमारास देशनूरहून आपल्या घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती माळमारुती पोलिसांना दिली. माळमारुतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यासह पंचनामा केला. ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे. गेल्या काही दिवसांपासून माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.